Take a fresh look at your lifestyle.

घर घेण्याचे स्वप्न लांबणीवर पडणार; यंदा दिवाळीत ‘म्हाडा’ कडून लॉटरी सोडत नाहीच!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : शहरात आपल्या हक्काचे घर व्हावे यादृष्टीने अनेकजण स्वप्न बघत असतात, सामान्यतः मध्यमवर्गीयांना मोठ्या शहरातील द्यावे लागणारे प्रचंड घरभाडे देण्याचा वैताग येत असतो. याला पर्याय म्हणून स्वतःच्या घरासाठी गुंतवणूक करणे कुणालाही आवडते. दरवर्षी म्हाडाकडून दिवाळीच्या मुहूर्तावर घरासाठी लॉटरीची सोडत काढण्यात येते, याअन्वये घरासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांपैकी अनेकांना आजवर घरे प्राप्त झाली आहे. यंदा दिवाळी नेमकी काही दिवसांवर येऊन ठेपली असून म्हाडाकडून लॉटरी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर पाणी पडले आहे.

अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता; ‘या’ प्रकरणी ईडीकडून चौकशी होण्याचे संकेत

सविस्तर वृत्त असे की, यावर्षी म्हाडाअंतर्गत घरे प्राप्त करण्यासाठी चार हजार अर्ज प्राप्त झाले होते, परंतु ऐनवेळी म्हाडाच्या सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने सध्या त्याच्या दुरुस्तीचे कार्य सुरु आहे. त्यामुळे सदर लॉटरी प्रक्रिया सध्या राबविणे शक्य नसल्याने म्हाडाकडून लॉटरी सोडतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे गृहीत धरल्यास गैर ठरणार नाही.

भारतीय रोजगार क्षेत्राला गती मिळणार; आगामी ५ वर्षांत ४७५ अब्ज डॉलर परकीय गुंतवणूकीचे संकेत

ज्या अर्जदारांनी घरांसाठी अर्ज केले होते त्यांना अजून वाट पाहावी लागणार असल्याचे सध्यस्थितीतून स्पष्ट होते. सदर सॉफ्टवेअर दुरुस्तीचे काम योग्यरीत्या पूर्ण झाल्यावर अधिकृतरित्या कळविण्यात येणार असल्याचे समजते तसेच काही नवीन बदल देखील यामुळे सॉफ्टवेअर मध्ये केले जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच अनेक जण विविध प्रकारची खरेदी दिवाळीत करतात त्याअंतर्गत दिवाळीत अनेक जणांचे घर घेण्याचे स्वप्न म्हाडा पूर्ण करत असते, परंतु यंदाच्या दिवाळीला घर घेणाऱ्यांना थोडं दमानं घेण्याचा सल्लाच जणू म्हाडा देत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.