Take a fresh look at your lifestyle.

सोनं-चांदीचा बाजार घसरला; ‘इतक्या’ रुपयांनी झाली घसरण

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गुरुवारी सकाळी बाजारपेठ उघडताच सोन्या चांदीच्या बाजारात मोठी घसरण झाली.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या सोन्याचे दर घसरल्यामुळे हे बदल झाल्याचं सांगितलं जात आहे. पितृपक्षात सोन्याचे दर घसरले आहेत. तर नवरात्रीपर्यंत पुन्हा हे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेला भाजपचा दणका; गोव्यात काँग्रेसला खिंडार

सोनं खरेदी करायचं असेल तर पितृपक्षातील अष्टमीला करावं असं म्हणतात. सोन्याचे दर घसरल्याने सोनं खरेदीसाठी ही सुवर्ण संधी आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव २०० रुपयांनी उतरला आहे. एक तोळे सोन्यासाठी ग्राहकांना ४९,८१५ रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीच्या दरात ०.२५ टक्क्यांनी घट झाली आहे. किलो ग्रॅमसाठी ५६,८३० रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबईत ईडीची कारवाई; हाती लागलं मोठं घबाड

दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी प्रति १० ग्रॅमसाठी ५०,८८१ रुपये असलेला सोन्याचा भाव बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव २६५ रुपयांनी उतरून प्रति १० ग्रॅमसाठी ५०,६१६ रुपये झाला. याचा बरोबर चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली. चांदीचा भाव ७८६ रुपयांनी घसरून ५७,२४४ रुपये प्रति किलो झाला.सणासुदीच्या काळात पुन्हा सोन्याला झळाळी येण्याची शक्यता असल्यामुळे ही संधी दौडू नये असं तज्ज्ञांचं मत आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.