Take a fresh look at your lifestyle.

वीज ग्राहकांवर दरवाढीची ‘टांगती तलवार’; महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला आता आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. भविष्यात वीज ग्राहकांना दरवाढीचा धक्का बसणार आहे. गेल्या सहा महिन्यांत महावितरणच्या वीज खरेदी खर्चात १३ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे राज्यातील वीजदरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात वीज खरेदी खर्चात २७ टक्क्यांनी वाढ झाली होती. वीज नियामक आयोगाने एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत महावितरणला वीज खरेदीसाठी 30 हजार 746 कोटी रुपये मंजूर केले होते, परंतु प्रत्यक्षात कंपनीने 34 हजार 806 कोटी रुपये वीज खरेदी खर्च केला आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी ग्राहकांवर वीज दरवाढीची टांगती तलवार आहे.

विनोद कांबळींना आली 1 लाख पगाराची ‘ऑफर’

यापूर्वी जानेवारी 2022 मध्येही महावितरणने प्रति युनिट 25 पैशांनी दरवाढ केली होती. आता पुन्हा एकदा विजेच्या दरात वाढ होणार असल्याचे समोर येत आहे. या महागाईचा फटका महावितरणच्या ग्राहकांना बसणार आहे. कोळसा आणि इंधनाच्या किमती वाढल्याने इंधन समायोजन आकारात वाढ होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

सर्वसामान्यांना झटका –

दरम्यान, राज्यभरात दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. डिझेल, पॅकिंग कच्चा माल आणि विजेचे दर वाढल्याने दुधाचे भाव समोर येत आहेत. त्यामुळे एकूणच या सर्व दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.