Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रुपया पुन्हा होरपळला; भांडवली बाजारातील चलन गुंतवणुकीचा थेट परिणाम

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील काही महिन्यांपासून सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाचे( Dollar Rupees Comparision) अवमूल्यन होत आहे, भविष्यात ही स्थिती कायम राहिल्यास भारत सरकारसमोर(Indian Government) वित्तीय तुटीचे नवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. याबाबतीत रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरुवातीपासून उपाययोजना केल्या परंतु त्याचा काही फायदा सध्यातरी होताना दिसत नाही आहे. ताज्या चलन आकडेवारीनुसार भारतीय रुपयाचे डॉलरच्या तुलनेत २२ पैश्यांनी अवमूल्यन झाल्याने एक डॉलरची किंमत भारतीय रुपये ७९.४८ इतकी झाली आहे.

आदित्य ठाकरेंविरोधात FIR दाखल करा; राष्ट्रीय बाल आयोगाचा आदेश

परदेशी गुंतवणूकदारांनी( Foreign Investors) भांडवल बाजारातून चार हजार कोटींची गुंतवणूक काढून घेतल्याचा फटका रुपयाच्या अवमूल्यनाच्या(Down Value) स्वरूपात बसला असून यामुळे परदेशातून आयात होणाऱ्या वस्तू महागण्याची (Inflation) शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी स्थिती समाधानकारक असताना अचानक भांडवल बाजारातील परदेशी गुंतवणूक कमी झाल्याने रुपया होरपळला आहे. यामुळे स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला काही योजनांच्या अनुदानात कपात करावी लागू शकते. रुपयाचा डॉलरच्या तुलनेत नीचांक वाढत्या महागाई काळात सरकारसमोर नवे आर्थिक संकट(Financial Crisis) असल्याने केंद्र सरकारला सावधपूर्वक स्थितीला नियंत्रणात राखणे गरजेचे असेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.