Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मीर फाइल्स’ने मोडला ‘दंगल’चा रेकॉर्ड, आतापर्यंत केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – ‘विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर चढाओढ सुरूच आहे. आज आठव्या दिवशी या चित्रपटाने जवळपास सर्वच रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करतानाच एकूण 116.45 कोटींची कमाई केली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

इतकंच नाही तर द काश्मीर फाइल्सने 8 व्या दिवशी कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या दंगलचा रेकॉर्डही मोडला आहे. सर्वात मजेदार गोष्ट म्हणजे दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाला पूर्वीपेक्षा जास्त स्क्रीनिंग मिळाले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाला 630 हून अधिक स्क्रीन्स होत्या, पण 8व्या दिवसापर्यंत काश्मीर फाइल्स 4000 स्क्रीन्सवर दाखवल्या जात आहेत.

हेही वाचा – सोन्याची झळाळी उतरली, नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण!

आतापर्यंत आमिर खानचा ‘दंगल’ आणि प्रभासच्या ‘बाहुबली: द कन्क्लूजन’ या चित्रपटांनी आठव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. दंगल चित्रपटानं आठव्या दिवशी 18.59 कोटी रुपये एवढी कमाई केली होती. आतापर्यंत या चित्रपटानं 116.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या बच्चन पांडेला ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. टीझर पाहिल्यानंतर आणि गाणे ऐकल्यानंतर चाहते आणि फॉलोअर्स चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. पण रिलीज होताच काही लोकांनी ‘बच्चन पांडे’वर टीका करायला सुरुवात केली.

हेही वाचा – होळीच्या सणात रंगाचा बेरंग; धुळवडीत फुगा मारल्यानंतर रिक्षा उलटली, पहा थरारक व्हिडिओ….

या चित्रपटात अक्षय कुमारची व्यक्तिरेखा लोकांना मारणाऱ्या हिंसक गुन्हेगाराची आहे. आता या पात्रासोबत ‘पांडे’ हे आडनाव वापरण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर ट्विटरवर #BoycottBachchhanPaandey हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.

हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! महाराष्ट्रातील ‘या’ गावात निघते जिवंत माणसाची प्रेतयात्रा!

Leave A Reply

Your email address will not be published.