Take a fresh look at your lifestyle.

सकाळ खराब करणाऱ्याचीच आज सकाळ खराब, बरं वाटतंय – नितेश राणे

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : ईडीचे (ED) एकापाठोपाठ एक छापे पडत आहेत. आता तपास यंत्रणेचे पथक शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भांडुप, मुंबईतील घरी पोहोचले आहेत. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले जाऊ शकते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांची चौकशी सुरू आहे. यावर सर्वत्र प्रतिक्रिया उमटत असून भाजपचे नेते नितेश राणे (BJP Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना चांगलाच टोला लगावलाय.

राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूने रचला इतिहास; गोल्ड मेडल जिंकत नवा विक्रम केला नावावर

“रोज सर्वांची सकाळ खराब करणाऱ्याची सकाळ आज खराब झाली, त्यामुळे चांगलं वाटतंय, पत्राचाळीत राहणाऱ्या गरीब मराठी लोकांना आज न्याय भेटेल. राऊत झुकेगा नही असे म्हणत होते, मात्र आता आत सुकेंगा नही? असं विचारा त्यांना.” असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

भ्रष्टाचार केला म्हणून त्याची शिक्षा भोगावी लागेल, यांचे सहकारी म्हणतील की सत्तेचा गैरवापर सुरू आहे. मात्र लोकांना फसवल्यावर त्याची किंमत मोजावी लागेलच असेही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

मी शिवसेना सोडणार नाही, मरेन पण…; ईडीची धाड पडताच राऊतांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात 1 हजार 039 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. आज सकाळीच ईडीचे काही अधिकारी संजय राऊतांच्या घरी दाखल झाले. ईडीने पाठवलेल्या समन्सला  (ED Summons) त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं आज ईडीची टीम थेट राऊतांच्या घरी पोहोचली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरजोर घोषणा देत आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.