Take a fresh look at your lifestyle.

वाहतूक कोंडीत राज्याच्या राजधानीचा जगात तिसरा क्रमांक

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : वाढती लोकसंख्या, महानगरीकरण, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची भर, वाहतुक नियमांचे उल्लंघन इत्यादींमुळे केवळ देशातच नव्हे तर विदेशात देखील प्रतिदिवशी वाहतूक कोंडी होत असते. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात देशातील विविध भागातून लोक रोजगाराच्या निमित्ताने येत असतात त्यामुळे शहरातील विविध भागात दाटीवाटी बघायला मिळते. हल्लीच्या धकाधकीच्या काळात मुंबईसारख्या शहराचे जीवनमान हे घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चालते, त्यामुळे वाहनाच्या मोठ्या संख्येने वाहतुकीच्या समस्या निर्माण होताना बघायला मिळते. लंडन येथील गो शॉर्टी या कंपनीने जगातील अत्याधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांची यादी नुकतीच सादर केली, या यादीत मुंबईचा तिसरा क्रम लागला आहे.

७५ वर्षांनी भारतात ‘चित्ता’ परतला; पंतप्रधान मोदींनी कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्यांना सोडलं

यादीत पहिला क्रम तुर्कीची राजधानी असलेल्या इस्तंबूलचा अग्रक्रम लागला आहे, तर कोलंबियाची राजधानी असलेले बोगोटा शहर दुसऱ्या स्थानी आहे, वाहतूक कोंडीच्या बाबतीत भारतातील अन्य शहरे देखील आहे ज्यामध्ये देशाची राजधानी दिल्लीसह बंगळूर शहर पाचव्या क्रमावर आहे. यांनतर पुणे शहर हे नवव्या स्थानी आहे. अहवालात वाहतूक कोंडीची काही प्रमुख कारणे देखील नमूद केली गेली आहे ज्यामध्ये उपलब्ध रस्त्यांच्या तुलनेत वाहनांची भरमसाठ वाढ, प्रति किलोमीटर अंतरावर ९७५ वाहने इतका मोठा वाहन आकडा, खड्डेमय रस्ते व बेशिस्तीत वाहन चालविण्याचा कल तसेच अपूर्ण अवस्थेत किंवा निर्माणाधीन मार्गाच्या समस्या इत्यादींचा देखील समावेश आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडन दौऱ्यावर; महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला लावणार हजेरी

वर्ष २०१२ ते २०१८ या कालावधीत एकट्या मुंबई शहरात दुचाकी वाहनांच्या संख्येत ३. १ टक्के इतकी वाढ झाली तर त्याच तुलनेत चारचाकी वाहनांच्या संख्येत ७,२ टक्के इतकी वाढ झाली आहे, प्रदूषण तज्ज्ञांच्या मते सिग्नलवर वाहने सुरु ठेवणे, वाहतूक कोंडीच्या जागी मास्कचा वापर न करणे यामुळे श्वसनसंस्थेच्या होणाऱ्या आजारात देखील दिवसागणिक वाढ होत आहे, एका अहवालानुसार वर्षनिहाय मुंबईतील जनता १२१ तास हे वाहतूक कोंडीत दवडतात. एकंदरीतच खराब मार्ग वगळता वाहतूक नियमांची पायमल्ली करणे टाळल्यास मुंबईसारख्या शहरातील वाहतूक कोंडीवर नक्कीच मार्ग शकतो. यासाठी शासनाच्या प्रयत्नाव्यतिरिक्त जनतेचे परस्पर सहकार्य देखील तितकेच महत्वाचे ठरते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.