Take a fresh look at your lifestyle.

‘या’ दोन मोठ्या व्यक्तींच्या पत्नींना मिळणार निवडणूक लढविण्याची संधी; गुजरात आणि उत्तरप्रदेश मधून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशात आगामी काळात गुजरात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सर्व प्रमुख पक्षांचे लक्ष या निवडणुकीवर लागले आहे. यावेळी काही राज्यातील लोकसभा मतदार संघासाठी देखील पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये उत्तरप्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे निधन झाल्याने मैनपुरी मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना समाजवादी पक्षाकडून पोट निवडणुकीचे तिकीट देण्यात येणार आहे. डिंपल यादव या दिवंगत नेते मुलायम सिंह यादव यांच्या सून आहेत.

अर्थविश्व : जागतिक मंदीत अमेरिकेतील नोकरकपातीचा भारताला फायदा; भारतात गुंतवणुकीचा कल वाढणार

दुसरीकडे गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा यांच्या पत्नी रिवाबा जाडेजा यांना जामनगर मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जामनगर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो जिथून दरवेळी भाजप उमेदवाराने विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे येत्या काळात दोन मोठ्या व्यक्तींच्या पत्नींना निवडणुकीत आपले नशीब आजमवण्यास मिळणार आहे.

ठरलं ! नीरव मोदी भारतात येणार; लंडन कोर्टानं याचिका फेटाळली

येत्या ५ डिसेंबरला या निवडणूका पार पडणार आहेत. सध्या समाजवादी पक्षाचे अजून एक नेते आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामपूर या आझम खान यांच्या मतदारसंघाच्या निवडणुकीवर सध्या स्थगिती लावण्यात आली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.