Take a fresh look at your lifestyle.

…मग नोटांवर भारतरत्न डॉ. आंबेडकर का नकोत? ‘या’ नेत्याची केजरीवालांना विचारणा

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणेशाची छायाचित्रे छापण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. तसेच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर टीका करत गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. दरम्यान, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केजरीवाल यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो चलनी नोटांवर का नको? असा सवाल केला.

SBIने ग्राहकांसाठी दिला मोठा अलर्ट; पाहा काय केलं ट्विट?

मनीष तिवारी यांनी ट्विट करून नवीन चलनी नोटांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. “नोटेच्या एका बाजूला महात्मा गांधींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापा.” असं ट्विट मध्ये नमूद करत “नवीन नोटांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नसावा? एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉ.बाबासाहेब आंबेडकर. अहिंसा, घटनावाद आणि समतावाद आधुनिक भारताच्या प्रतिभेला उत्तम प्रकारे जोडण्यासाठी एका अनोख्या पद्धतीने एकत्रित करेल.” असं मनिष तिवारी म्हणाले आहेत.

“राष्ट्रवादीला आणखी १५ वर्षे सत्तेसाठी तळमळावे लागेल”- शंभूराज देसाई

दरम्यान, नवीन चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि देशाचा विकास करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांच्या आशीर्वादाची गरज असल्याचे सांगत त्यांनी ही मागणी केली आहे. नोटांवर महात्मा गांधींचा फोटो ठेवावा आणि दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा, असे केजरीवालांनी म्हटले आहे. याबाबत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.