Take a fresh look at your lifestyle.

“तर मी राजीनामा देईल! “दीपक केसरकरांची सिंहगर्जना; विरोधकांना दिले प्रत्युत्तर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सध्या राज्यात विधानसभेचे आदिवेशन सुरु असून विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांविरोधात पहिल्या दिवशीपासूनच घोषणांचा सपाटा लावला आहे. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी “५० खोके एकदम ओके” , “खाऊन पन्नास पन्नास खोके माजलेत बोके” इत्यादी घोषणा दिल्या. घोषणाबाजीचे हे सत्र नित्याचेच झाले असून रोज अधिवेशनापूर्वी “आले रे गद्दार”, ईडी सरकार हाय हाय इत्यादी घोषणाबाजी सुरु असल्याचे चित्र आहे. नेमकी याच प्रकरणावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी आता प्रतिक्रिया देत, विरोधकांना खरमरीत उत्तर दिले आहे.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सप्टेंबरपासून मिळणार अनुदान; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, ५० खोके सोडा, ५० रुपये जरी दिले असेल तर मी राजीनामा देईल. आम्ही आमच्या तत्वासाठी भांडलो आहे परंतु सत्ता गेल्याचे शल्य विरोधकांना चांगलेच बोचलेले दिसत आहे. परंतु स्वतःला वाईट वाटले असताना दुसऱ्याची बदनामी किती करावी याला सुद्धा मर्यादा असली पाहिजे. एकंदरतीच विरोध, आरोप- प्रत्यारोप प्रकरण थेट विधानभवनात सुरु असल्याने आपण लोकप्रतिनिधी आहोत याचा विसर देखील सध्या विरोधी पक्षांना पडला असल्याचे चित्र आहे. येत्या काळात विरोधक व सत्ताधारी संघर्ष शिगेला पोहोचल्यास नवल कसले, असेच म्हणावे लागेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.