Take a fresh look at your lifestyle.

… तर मी राजकारणात आलो नसतो; ‘राज’ पुत्र अमित ठाकरेंचे मोठे विधान

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी औरंगाबाद येथील दौऱ्याप्रसंगी एक सूचक असे विधान केले. सध्या अमित ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी बीड व औरंगाबादला भेट दिली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अमित ठाकरे यांनी त्यांच्यासोबत दिलखुलास चर्चा केली. प्रसंगी बोलताना एक सूचक विधान करताना अमित ठाकरे म्हणाले की, हे बरं झालं मी फार पूर्वीपासून राजकारणात आलो, कारण आजच्या राजकारणाची स्थिती बघता जर मी राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो.

ऐन दिवाळीत महामंडळ एस.टी बस प्रवास महागणार; भाडेवाढ जाहीर

पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, आजची राजकारणाची स्थिती बघता मला नक्कीच राजकारणात यायला आवडले नसते परंतु राजसाहेबांनी मला जबाबदारी दिली त्यामुळे विद्यार्थ्यांकरिता काहीतरी करण्याच्या, त्यांना संधी देण्याच्या दृष्टीने मी मनसे विद्यार्थी सेना अध्यक्षपद स्वीकारले. दसरा मेळावा कुणाचा बघितला या प्रश्नला उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले की, दोन्ही नेत्यांचे दसरा मेळावे हे केवळ चिखलफेक करणारे होते. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर, नागरिकांच्या समस्येवर कुणीच बोलले नाही. त्यामुळे का म्हणून असे मेळावे ऐकायचे? असा प्रतिप्रश्नच अमित ठाकरेंनी उपस्थित केला.

परतीच्या पावसाची जोरदार बॅटिंग; राज्यातील अनेक जिल्ह्यांना अक्षरशः धो-धो धुतले

या दौऱ्याप्रसंगी अमित ठाकरे यांनी औरंगाबाद तसेच बीड येथील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. याशिवाय विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींची माहिती देखील घेतली. यावेळी प्रत्येक महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे स्वतंत्र युनिट स्थापन करण्याची घोषणा देखील अमित ठाकरेंनी केली. जे पक्षासाठी खरे कार्य करणारे पूर्वीचे विद्यार्थी आहे मला त्यांना भेटण्याची इच्छा आहे असे देखील यावेळी अमित ठाकरे म्हणाले.

एकंदरीतच मराठवाडा दौऱ्याद्वारे मनसे ची युवा वर्गाच्या नेतृत्वात भक्कम आघाडी उभी करण्यावर पक्ष विद्यार्थीसेना अध्यक्ष भर देत असल्याचे स्पष्ट होते. येत्या काळातील निवडणुकांमध्ये याचा पक्षाला किती फायदा होईल हे त्यावेळी उलगडेलच.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.