Take a fresh look at your lifestyle.

“…तर वेठबिगारी करून घेणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील”; राज ठाकरेंचा इशारा

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आज पत्र लिहीत लहान मुलांच्या वेठबिगारीबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं, असे म्हटले आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट दाखवत आवाज उठवला आहे. राज्यातील लहान मुलांना वेठबिगारी करावी लागत असल्याच्या घटनांकडे लक्ष वळवून स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात या घटना घडणे राज्याला शोभणारे नाही. पैशासाठी मुलांवर अत्याचार व्हावेत हे भयंकर आहे. अशा आशयाच्या बातम्या वाचून मन पिळवटून जाते, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत असल्याचेही ते म्हणाले. (Raj Thackeray post on maltreatment of children made an important demand to the government )

उद्धव ठाकरेंच्या ‘बाई’ शब्दोच्चारावर भावना गवळींचे प्रत्युत्तर; व्यक्त केले दुःख

राज ठाकरे यांनी बाल शोषणाबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार वाढत असल्याचे बोलले जात आहे. तसेच राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

वाचा राज ठाकरे पत्रातून काय म्हणाले…

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.