Take a fresh look at your lifestyle.

बापरे! असं काय घडलं की नवरदेव-नवरीने मंडपातच एकमेकांना धू-धू धुतलं; हा Video पाहून व्हाल शॉक

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – कधी कधी लग्नाच्या दिवशीच अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास बसत नाही. बहुतेकदा आपण लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेवाच्या चेहऱ्यावर हसूच पाहतो आणि ते खूप आनंदी असतात. मात्र, काहीवेळा छोट्याशा चुकीमुळे गोंधळ निर्माण होतो.

तात्काळ जमा करा तुमचं रेशनकार्ड, अन्यथा सरकार करणार कडक कारवाई

भारतात लग्नाचा सिझन (Wedding Season in India) सुरू झाला असून आता वेगवेगळ्या प्रकारचे लग्नाचे व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत. सध्या लग्नाच्या अशाच एका व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. यात स्टेजवर उभ्या असलेल्या नवरी आणि नवरदेवाचं छोट्या गोष्टीवरून भांडण होतं आणि यानंतर दोघंही एकमेकांची धुलाई करतात.

Loan बँकेचं लोन लवकर फेडायचे आहे? ‘ही’ पद्धत येईल कामी; व्याजही वाचेल आणि टेन्शनही नाही

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभे असल्याचं पाहायला मिळतं. हार घालताना नवरी नवरदेवाला मिठाई खाऊ घालू लागते, परंतु नवरदेवाचं संपूर्ण लक्ष कॅमेऱ्याकडे आहे. नवरी काही सेकंद थांबते आणि त्याने समोर बघण्याची वाट बघते, परंतु बराच वेळ नवरदेव तिच्याकडे पाहत नाही, यामुळे नवरी चांगलीच भडकते.

https://www.instagram.com/reel/Ccx5dtJPG8R/?utm_source=ig_web_copy_link

यानंतर जे काही घडतं, त्याचा तिथे उपस्थित कोणी विचारही केला नसेल. नवरी रागात नवरदेवाच्या चेहऱ्यावर मिठाई फासते. हे पाहून नवरदेव भडकतो आणि तो नवरीच्या कानशिलात लगावतो. याच्या उत्तरात नवरीही नवरदेवाला चापट मारताना दिसते. यानंतर नवरी आणि नवरदेव अगदी जोरजोरात एकमेकांना चापट मारू लागतात.

शिवसेनेतील नाराजी उघड; ‘त्या’ एका आदेशामुळे पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे! राजकारणात खळबळ

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक असंही म्हणू लागले आहेत की नवरी-नवरदेवाच्या भांडणाचा हा व्हिडिओ खोटा असून त्यात ते अॅक्टिंग करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. हे प्रकरण कुठलं आहे किंवा या व्हिडिओमागील सत्य काय आहे, याची सध्या तरी पुष्टी झालेली नाही. सोशल मीडियावर लोक हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्याची खिल्ली उडवत आहेत.

इन्स्टाग्रामवर only..sarcasm नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड होताच तो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करत यूजरने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आजच मारून टाकशील का?’. या व्हिडिओवर यूजर्सनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

PAN-Aadhaar लिंक होत नाहीय? जाणून घ्या कारणं; असं करा ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्ड (PAN Card) आधार कार्डशी लिंक

Leave A Reply

Your email address will not be published.