Take a fresh look at your lifestyle.

होम लोन घेण्याचा विचार करताय? ‘या’ बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – स्वतःच एक सुंदर घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. शिवाय आपापल्या बजेटनुसार प्रत्येकाचं एक ड्रीम होम देखील असत. अशा वेळी होम लोन घेण्याचा सर्वजण विचार करतात. मात्र, कोणती बँक किती टक्के व्याजदराने कर्ज देते याची पुरेशी माहिती अनेकांना नसते. किंवा एकूण किती रकमेचं लोन बँक देऊ शकते याची देखील कल्पना येत आहि. त्यामुळे आज आपण अशा बँकांची माहिती देणार आहोत ज्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदराने घरासाठी कर्ज(Home Loan) उपलब्ध करून देतात.

अनेकदा लोक त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त गृहकर्ज घेतात. याचे एक मोठे कारण भविष्यात मालमत्तेचे मूल्य आहे. हे बहुतेक वेळा कालांतराने वाढू लागते. म्हणूनच घरासाठी मोठे कर्ज घेण्यास माणूस मागेपुढे पाहत नाही. म्हणूनच याला ‘गुड लोन’ असेही म्हणतात.

पंतप्रधानांची भेट घेऊन शरद पवारांनी ‘त्या’ तिघांचा केला करेक्ट कार्यक्रम! राज्याच्या राजकारणात खळबळ

दुसरे म्हणजे, गृहकर्जाचे दर इतर सर्व कर्जांपेक्षा स्वस्त आहेत आणि बहुतेकदा हा एकमेव मार्ग आहे की एखादी व्यक्ती घर खरेदी करू शकते. मात्र सध्या गृहनिर्माण प्रकल्प किती प्रदीर्घ काळापासून सुरू आहेत आणि कधी कधी घराच्या चाव्या हातात यायला ठरलेल्या वेळेव्यतिरिक्त अनेक वर्षांचा कालावधी लागत असल्याचे आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल, तर तयार घरांना तुमची पहिली पसंती द्या. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, भारतातील मोठ्या बँकांनी दिलेली काही स्वस्त कर्जे पाहू. हे सर्व दर 30 लाखांच्या रकमेवर 20 वर्षांसाठी घेतलेल्या कर्जानुसार दिले जातात.

तुमचा स्मार्टफोन किंवा आयफोन हरवला आहे का? या ट्रिक्स वापरून मिळवा परत

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra)

ही बँक तुम्हाला 6.40-9.55 टक्के व्याजदराने कर्ज देते. त्याच्या दरानुसार, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 22,191-28,062 रुपयांपर्यंतचा EMI भरावा लागेल. बँक कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के किंवा जास्तीत जास्त 25,000 रुपये प्रक्रिया शुल्क आकारते.

बँकेचा व्याज दर 6.4-11.5 टक्के, EMI 22,191 ते 31,993 रुपयांमध्ये असेल. प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 1 टक्के किंवा किमान 5,000 रुपये आहे.

इंडियन बँक (Indian Bank)

बँकेचा व्याज दर 6.50-7.50 टक्के आहे, त्यानुसार EMI 22,367 ते 24,168 रुपये यामध्ये असेल. प्रक्रिया शुल्क – कर्जाच्या रकमेच्या 0.20 ते 0.40 टक्के किंवा किमान 5,000 रुपये असेल.

पंजाब आणि सिंध बँक (Punjab And Sindh Bank)

बँकेचा व्याज दर 6.50-7.60 टक्के आहे. त्यानसार EMI 22,367 ते 24,352 रुपये असा असेल. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.15 ते 0.25 टक्के आणि GST असेल.

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda)

बँकेचा व्याज दर 6.50 ते 8.10 टक्के असा आहे. त्यानुसार ईएमआय 22,367 ते 25,280 रुपये असेल, तर प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के किंवा किमान 8500 आणि कमाल 25000 अधिक जीएसटी असेल.

बँक ऑफ इंडिया (Bank Of India)

बँकेचा व्याज दर 6.50-8.85 टक्के आहे. यानुसार EMI 22,367 ते 26,703 रुपये असेल. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के असेल.

आयडीएफसी बँक (IDFC Bank)

बँकेचा व्याज दर 6.50 ते 8.90 टक्के आहे. त्यानुसार ईएमआय 22,367 ते 26,799 रुपये आणि प्रक्रिया शुल्क 10,000 रुपयांपर्यंत असेल.

कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)

व्याज दर 6.55 ते 7.20 टक्के आहे. त्यानुसार EMI 22,456 ते 23,620 रुपये असेल. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेपैकी 2 टक्के तसेच GST आणि इतर कर असं असेल.

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India)

या बँकेचा व्याज दर 6.60-7.35 टक्के आहे यानुसार EMI 22,544 ते 23,890 रुपयांपर्यंत असेल. तर प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 किंवा जास्तीत जास्त15,000 अधिक GST असेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India)

व्याज दर 6.70 ते 6.90 टक्के आहे. यानुसार EMI 22,722 ते 23,079 असेल. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.35 किंवा कमाल 10,000 असेल.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank)

व्याज दर 6.70-7.55 टक्के आहे. यानुसार ईएमआय 22,722 ते 24,260 रुपये असेल. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50-2.00 टक्के असेल.

एचडीएफसी (HDFC Bank)

व्याज दर 6.70-7.65 टक्के आहे. यानुसार EMI 22,722 ते 24,444 रुपयांमध्ये असेल. तर प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.50 टक्के किंवा 3000 रुपये यापैकी जे जास्त असेल ते अधिक कर.

पंजाब नॅशनल बँक (PNB)

व्याज दर 6.75-8.80 टक्के आहे. यानुसार EMI 22,811 ते 26,607 रुपये असेल. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 0.35 टक्के किंवा कमाल 15,000 रुपये असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.