Take a fresh look at your lifestyle.

‘या’ पाच टीप्स तुम्हाला भविष्यात पैशाची चणचण भासू देणार नाही; वाचा सविस्तर…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : आनंदी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी चांगले उत्पन्न असणे आवश्यक आहे. सोबतच सुरक्षित भविष्यासाठी त्या उत्पन्नातून योग्य आर्थिक नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या खर्चाचे व्यवस्थापन तसेच गुंतवणूक करता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जमा केलेल्या भांडवलावर परतावा मिळतो. बर्‍याच वेळा आपल्याला एकाच वेळी जास्त निधी उभारावा लागतो, अशा वेळी योग्य आर्थिक नियोजनच कामी येते, जे कर्जात बुडण्यापासून वाचवू शकते.

आपल्या उत्पन्नातून खर्च वजा केल्यावर त्या पैशाचा योग्य वापर करून आपण अधिक पैसे कमवू शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्या तुम्हाला चांगल्या आर्थिक नियोजनात मदत करू शकतात.

‘या’ दिवशी भारतात सुरू होणार ट्विटर ब्लू टिकसाठी पेड सर्व्हिस; एलॉन मस्क यांची स्पष्टोक्ती

शेअर बाजारात गुंतवणूक करा

दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी शेअर बाजारातील गुंतवणूक खूप फायदेशीर ठरू शकते. इतर ठिकाणांच्या तुलनेत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीत जोखीम असली तरी आधी तुम्ही रिसर्च करून मार्केट समजून घ्या.

विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक

कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागू शकते. यात जीवित आणि वित्तहानीची भीती असते. अशा परिस्थिती होणारे आर्थिक नुकसान विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून कमी करता येते. यासाठी तुम्ही जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकता. आरोग्य विमा गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी खूप मदत करते. तरुण वयात विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आहे. कारण नंतर आपल्याला कमी प्रीमियम भरावा लागतो.

राजकीय वर्तुळात पुन्हा युतीची चाहूल? भाजप करणार नवीन गेम!

स्वतंत्र आपत्कालीन निधी ठेवा

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आली की बऱ्याचवेळा लोक कर्ज काढून पैशाची व्यवस्था करतात. मात्र, तुमचे आर्थिक नियोजन योग्य असेल तर तुम्हाला कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. जर आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत आहोत तर बहुतेक समस्यांना तोंड देणे सोपे होते. यासाठी तुम्ही स्वतंत्र आपत्कालीन निधी तयार करू शकता. यासाठी तुम्ही तुमचे एखादे बँक खाते वापरू शकता, ज्यामध्ये दरमहा काही पैसे जमा करत राहा आणि आपत्कालीन परिस्थितीतच पैसे काढा.

व्याजात कमीत कमी पैसे खर्च करा

बहुतेक लोक मोठ्या कामासाठी कर्जाद्वारे पैशाची गरज भागवतात. जसे घर बांधण्यासाठी गृह कर्ज, वाहन खरेदी करण्यासाठी कार कर्ज किंवा इतर गरजांसाठी वैयक्तिक कर्ज घेणे. परंतु, कर्जाच्या हप्त्यांसह, एखाद्याला दीर्घ काळासाठी व्याज द्यावे लागते, ज्यामध्ये मोठी रक्कम खर्च केली जाते. ही रक्कम कमी करण्यासाठी, तुम्ही कर्जाची प्रीपेमेंट निवडू शकता. त्याच वेळी, चांगल्या आर्थिक नियोजनासह आपल्या स्तरावर पैशाची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’; उद्धव ठाकरेंनी केलं भाजपा-शिंदे गटाला लक्ष्य

नोकरीनंतरचे नियोजन

‘बागबान’ या चित्रपटातील एक संवाद आहे, ‘निवृत्तीनंतर, आपका पैसा ही सबसे बड़ी ताकत है.’ म्हणून नोकरी करताना निवृत्तीनंतरची बचत करा. यासाठी पगारदार लोक स्वैच्छिक भविष्य निर्वाह निधीद्वारे पीएफ खात्यात त्यांचे योगदान वाढवू शकतात. याशिवाय गुंतवणुकीसाठी तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इतर कोणताही पर्याय निवडू शकता. जिथे तुम्ही नियमितपणे पगारातून छोटी रक्कम गुंतवता. नंतर, ही रक्कम गोळा करणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.