Thibak Scheme | ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळतंय 1,27,000 रुपये अनुदान, योजनेचा लाभ असा घ्या

0
Government Scheme: राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व पाण्याची बचत होऊन पाण्याचा वापर कमी प्रमाणात करून चांगले पीक काढावे जेणेकरून शेतीचा आणि शेतकऱ्यांचा दोन्हींचा विकास व्हावा यासाठी सरकारने खास योजना सुरु केली आहे.
राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी सातत्याने विविध योजना राबवत असते. शेतकऱ्यांना ठिंबक व तुषार सिंचनासाठी सरकारकडून भरघोस अनुदान मिळणार आहे. त्यासाठी सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना व राज्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन या दोन योजनांतून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना आणली आहे. (Thibak Sinchan Yojana) या योजनेमार्फत राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना आता 90 टक्के अनुदानाचा लाभ होणार आहे.
अनुदान किती मिळणार..?
शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान मिळणार आहे, म्हणजेच जवळपास हेक्टरी 1 लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत लॅटरल अंतरानुसार अनुदान दिलं जाते. 1 हेक्टर ठिबक सिंचनसाठी 80 टक्के अनुदान दिले तर 1,2001 रुपये तर तुषार सिंचनासाठी 19,355 रुपयांपर्यंत मदत दिली जाते.
Thibak Sinchan Anudan Maharashtra 2023 ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे, अशा सर्वसाधारण शेतकऱ्यांना या योजनेमार्फत 75 टक्के अनुदान दिले जाते. तसेच अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असलेल्यांना 90  टक्के अनुदान दिले जाते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज
Tushar Sinchan Yojana राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर ठिबक व तुषार योजनेचा ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
  • सर्वप्रथम महाडीबीटी पोर्टल उघडा आणि एक शेतकरी एक अर्जावर क्लिक करुन युजर आयडी आणि पासवर्ड टाका किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी लॉगिन करा.
  • होमपेजवर क्लिक केल्यानंतर ‘अर्ज करा’ बटणावर क्लिक करा.
  • यानंतर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक घटक समोरील बाबी निवडवर क्लिक करा.
  • आता सिंचन स्रोत व ऊर्जा स्रोत पर्याय दिसतील. त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा तो पर्याय निवडा.
  • यानंतर, खाली जोडा शब्दावर क्लिक करा. तुमचा अर्ज सेव्ह होऊन जाईल.
  • आता तुम्ही पुन्हा मुख्यपृष्ठावर जा. येथे पुन्हा ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करा आणि सिंचन ‘साधने व सुविधा वरील बाबी निवडा’ वर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर मुख्य अर्ज ओपन होईल. अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
यानंतर, पेमेंट ऑप्शनवर Redirect केल्या जाईल. यावर तुम्हाला 23.60 रुपयांचे पेमेंट करायचे आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.