Take a fresh look at your lifestyle.

धंद्याची फ्रँचायझी घेताना 100 वेळा विचार करा

0
maher

अहमदनगर – पैश्याला पैसा ओढतो, असं ज्येष्ठ उद्योजक सांगतात. तुम्ही धंद्यात जितका जास्त पैसा लावाल, तितकाच जास्त नफा होतो. पैसा गुंतवला, म्हणजे विषय संपला असं नाही. फक्त पैसा लावून चालत नाही, तर त्यासाठी डोकंही लावणं गरजेचं आहे. स्वतःचं किंवा आई बापाच्या पैशावर अनेक जणांनी फ्रँचायझी घेतल्या आहेत. फ्रँचायझी घेताना यात प्रामुख्यानं दोन गोष्टी पाहिल्या जातात. पहिलं म्हणजे एखाद्या ब्रँडची फ्रँचायझी घेतली की खूप चालते, यातून नफाही जास्त होतो. दुसरं म्हणजे फ्रँचायझी घेऊन पैसा लावला की पैसा मिळणार म्हणजे मिळणार.

फ्रँचायझी सुरू झाली की

फ्रँचायझी देणारा हा खूप मास्टर माईंड माणूस असतो. तो पैसे कमवायला बसलेला असतो. आपण मात्र मागचा पुढचा कोणताही विचार न करता जाळ्यात अडकून बसतो. आपण जाळ्यात अडकण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्याकडे व्यावसायिक अक्कल नसते,असतो फक्त पैसा. इथेच जाऊन आपण फसतो. आणि एकदा फ्रँचायझी सुरू झाली की अडचणींचा डोंगर उभा राहतो. पैश्याच्या जोरावर उभा केलेला व्यवसाय अनुभवाच्या कमतरतेमुळे अडचणीत येतो.

सर्व बाबी व्यावसायिक पातळीवर पडताळून घ्या

फ्रँचायझी घेणं वाईट नाहीच. मात्र आपण आपली व्यावसायिक कुवत, व्यावसायिक ताकत, अनुभव, वेळेची गुंतवणूक, मार्केटिंगची पद्धत आणि कॅपिसिटी या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे, किंबहुना चेक करून घेतल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट ज्या सेवा आणि उत्पादनाची आपल्याला फ्रांचायझी घ्यायची आहे. त्याचा मार्केट अभ्यास, मार्केटचा सर्व्हे, गुंतवणूक परतफेडीची कालावधी, नफ्याची पद्धत, जाहिरात खर्च या सर्व बाबी व्यावसायिक पातळीवर पडताळून पहिल्या पाहिजेत. जर अस झालं नाही तर धंदा वर्षात बंद करावा लागेल.

उत्तम उदाहरण म्हणजे

याच उत्तम उदाहरण म्हणजे चहा, वडापावच्या अनेक फ्रँचायझी बंद पडल्या आहेत. काही डबघाईला आल्या आहेत. आपण या सर्व गोष्टींचा विचार न करता फ्रँचायझी टाकली आणि ती बंद करावी लागली, तर आपला व्यावसायिक उत्साह कमी होतो. पुन्हा धंदा करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे फ्रँचायझीबाबत जपून पावलं उचलली पाहिजेत.

संदीप थोरात
मो. 95529 83204
(धंद्याचे छक्के पंजे)

Leave A Reply

Your email address will not be published.