Take a fresh look at your lifestyle.

ट्विटर आणि मेटा कंपन्यांमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘ही’ कंपनी ठरणार संकटमोचक; नोकरीची दिली ऑफर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : जगभरात तंत्रज्ञानाच्या नवीनीकरणामुळे झपाट्याने बदल होत असताना येत्या काळात जगासमोर आर्थिक मंदीचे संकट देखील उभे आहे. अनेक देशांमध्ये मंदीची चाहूल लागली असून, विकसित देशांना मंदीच्या लाटेचे भय सतावत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मंदीचा जणू धसकाच घेतला असून, मंदीतून सावरण्यासाठी या दिग्गजांनी कर्मचारी कपात केल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मेटा आणि ट्विटर या दोन कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केल्याने हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता, परंतू या सर्व बेरोजगारांना आधार देण्याचा निर्णय भारतातील एका दिग्गज उद्योग समूहाने घेतला आहे. टाटा समूहाच्या टाटा मोटर्सची ब्रिटिश उपकंपनी जग्वार लँड रोव्हर अनेक देशांमध्ये कार्यरत असून टाटाने मेटा आणि ट्विटर मधून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीका प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मांडले मत; भविष्याबाबत केला प्रश्न उपस्थित

लँड रोव्हर जग्वार भारतासह आयर्लंड, ब्रिटन, अमेरिका, हंगेरी, चीन व्यतिरिक्त अनेक देशांमध्ये कार्यरत असून कंपनीने ८०० नवीन रोजगार उभारणीचे धोरण आखले आहे. कंपनी लवकरच क्लाउड सॉफ्टवेअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायंटिस्ट, इलेक्ट्रिफिकेशन, मशीन लर्निंग, ऑटोनॉमस ड्राइविंग, डिजिटल सेवा इत्यादी पदांकरिता रोजगार निर्मिती करणार आहे. यावेळी अभियांत्रिकी तसेच डिजिटल माध्यमांचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे.

राज्यपालांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; नितीन गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांसोबत

येत्या काही दिवसांमध्ये भारतात रोजगार निर्मितीची घोषणा टाटा कडून केल्या जाण्याची शक्यता आहे. टाटा च्या पुढाकाराने भारतात आयफोन च्या सुट्या पार्ट निर्मितीकरिता पुढाकार घेण्यात आला होता याचाच भाग म्हणून बंगळूरच्या होसूर परिसरात आयफोन निर्मिती करण्याचा कारखाना सुरु झाला आहे. टाटा समूहाकडून घेण्यात आलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे मेटा आणि ट्विटर मधून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टाटा मोटर्स ची उपकंपनी लँड रोव्हर जग्वार संकटमोचक ठरणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.