Take a fresh look at your lifestyle.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘ही’ दिग्गज कंपनी 10 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ; जागतिक मंदीचे सावट गडद

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जगभरात सध्या मंदीचे सावट अधिक गडद होताना दिसत आहे, याचा नेमका परिणाम म्हणजे अनेक मोठ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसताना दिसत आहे. आवश्यक खर्च भागवून कंपनीला सुरु ठेवण्यासाठी कुठेतरी खर्चात कपात करणे गरजेचे आहे, याकरिता पर्याय म्हणून थेट कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड चालविण्याचा प्रकार हल्ली सर्रासपणे सुरु आहे.

‘जी-२०’ परिषदेचे सकारात्मक परिणाम; ऑस्ट्रेलियन संसदेची भारतासोबत मुक्त व्यापाराला हिरवी झेंडी

आतापर्यंत मेटा आणि ट्विटर ने अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. मात्र, या मार्गावर जगातील सुप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनी असून या कंपनीने १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट ने हा निर्णय घेतला असून, ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या केवळ ६ टक्के असल्याचे समजते यावरून कंपनीचा आवाका लक्षात येतो.

राज्यात पुढील तीन दिवस थंडीचा जोर वाढणार; किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज

गुगलने कर्मचाऱ्यांसाठी नवीन धोरण बनविले असून यानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला रँकिंग आणि परफॉर्मन्ससाठी नियम बांधून दिले गेले आहे त्यामुळे कामचुकार आणि कमी परफॉर्मन्स देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येत आहे. यामुळे काढून टाकण्यात येणारे कर्मचारी केवळ बेरोजगार होणार नाही आहे तर पर्यायाने कंपनी त्यांचे बोनस आणि अनुदान देखील रोखू शकते, अशी माहिती पुढे आली आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचारी संख्या आणि त्यांच्यावर करण्यात येणारा अमाप खर्च याने आजवर कंपनीचे कंबरडे मोडले आहे. त्याला सोपा पर्याय म्हणून एका फंड मॅनेजमेंट कंपनीने दिलेल्या सल्ल्यानुसार अल्फाबेट ने अखेर दहा हजार कर्मचारी काढण्याचा निर्णय घेतला.

सीमा प्रकरणी समितीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; पंतप्रधानांसोबतची चर्चा उघड करण्याची मागणी

अल्फाबेटने वर्ष २०१७ साली कर्मचारी कपातीचा विचार केला होता, परंतू अंतिम टप्प्यात हा निर्णय बदलल्या गेला. मात्र आता जागतिक मंदीचे सावट असल्याने कंपनीला मोठ्या संख्येत असलेल्या कर्मचाऱ्यांचा खर्च झेपावत नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून परफॉर्मन्स रेटिंगनुसार दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. पुढे आलेल्या आकडेवारीनुसार अल्फाबेट कंपनीत एकूण १ लाख ८७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत, जो मोठा आकडा आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.