Take a fresh look at your lifestyle.

हा परतीचा पाऊस नसून मान्सूनच; हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मान्सूनच्या पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले असले तरी राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य आणि लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दरम्यान, ओडिशा, महाराष्ट्र आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतामध्ये पुढील चार-पाच दिवसांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.

पटेल महाविद्यालय पोषण आहार सप्ताह निमित्त ‘चवीचे जग साजरा करा’ यावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित

दिवसभर उन्हाचा तडाखा आणि त्यानंतर दुपारी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अनेक भागात रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज असून उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर परिसरात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर ठाणे, मुंबईत वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.