Take a fresh look at your lifestyle.

बचतीसाठी पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरते लाभदायक; पंतप्रधानही करतात गुंतवणूक

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भविष्यातील आर्थिक स्थैर्य म्हणून गुंवणूकीला विशेष महत्व असते. अनेकदा बचतीसाठी विविध पर्यायांपैकी कुठला निवडावा याबाबत अनेक जणांना संभ्रम निर्माण होतो. गेल्या अनेक दशकांपासून पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, याचे कारण म्हणजे हा बचतीचा सर्वात सुरक्षित व समाधानकारक परतावा देणारा पर्याय समजला जातो. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना आपणाकरिता लाभदायक ठरू शकते, ज्यामध्ये खुद्द देशाचे पंतप्रधान देखील गुंतवणूक करतात.

सायबर गुन्हेगारांविरुद्ध ‘सीबीआय’ची धडक कारवाई मोहीम; देशभरात ११५ ठिकाणांवर छापेमारी

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हा छोट्या गुंतवणुकीचा प्रकार असून यामध्ये अगदी शून्य जोखमेवर गुंतवणूक करता येते. इथे मुख्य बाब म्हणजे या योजनेचा लॉक इन काळ हा पाच वर्षाचा असतो ज्यामध्ये गुंतवणूकदार पाच वर्षांनंतर आपली गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचे एकूण ३ प्रकार असून ते खालीलप्रमाणे आहेत;

१. एकल प्रकार – या प्रकारात गुंतवणूकदार एकतर स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तींकरिता गुंतवणूक करू शकते.

२. जॉईंट ‘ए’ प्रकार – इथे या प्रकारात दोन व्यक्ती एकाच खात्यात गुंतवणूक करू शकतात.

३. जॉईंट ‘बी’ प्रकार – इथे दोन लोक गुंतवणूक करतात परंतु मॅच्युरिटी नंतर केवळ एकाजणाला गुंतवणुकीचा लाभ मिळतो.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील तलवारबाजांची पाच पदकांची कमाई; अन्य खेळांमध्ये संमिश्र कामगिरी

सदर योजनेत किमान १००० रुपये पासून गुंतवणूक करता येते, ज्याकरिता कुठलीही कमाल मर्यादा देखील नाही. इथे व्याजाचा दर हा ६.८ टक्के इतका मिळतो. याव्यतिरिक्त १.५ लाखांपर्यंत वार्षिक आयकरात सवलत देखील मिळते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.