Take a fresh look at your lifestyle.

‘या’ योजनेतून महिलांना कर्ज घेणे होणार अधिक सुलभ; भारत सरकारची अभिनव योजना

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : आजच्या काळात महिला या पुरुषांच्या बरोबरीने आर्थिक व सामाजिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकदा व्यवसाय उभारणी करायची झाल्यास सर्वात मोठी समस्या निर्माण होते ती म्हणजे भांडवलाची. महिलांना व्यवसाय उभारणीकरिता आर्थिक सहाय्य देण्याकरिता भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एक आगळीवेगळी अशी अभिनव योजना नव्याने राबविण्यात येत आहे ज्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांना स्वाभिमानाने जगण्यास मदत होणार आहे. या योजनेचे नाव महिला समृद्धी योजना असे असून या योजनेद्वारे काही निकषांची पूर्तता करून महिलांना कर्ज प्राप्ती होणार आहे.

‘5G’ सेवा लाँच झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

ज्या महिलांनी बचत गट उभारला आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार असून, ४ टक्के इतक्या व्याजदराने तीन वर्ष मुदतीचे कर्ज बचत गट सदस्य महिलांना मिळणार आहे. बचत गट महिला समृद्धी योजनेद्वारे २५,००० ते १,२५, ०० रुपये इतके कर्ज लाभार्थी महिला घेऊ शकणार असून तीन वर्षात त्यांना याची फरतफेड करावी लागणार आहे. सदर योजनेस पात्र ठरण्याकरिता काही निकष दिले गेले असून याकरिता लाभार्थी व्यक्ती ही मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती वर्गातील असणे गरजेचे आहे. याशिवाय बचत कर्ज गटातील महिला देखील या योजनेकरिता अर्ज करू शकणार आहे. बीपीएल श्रेणीतील महिला या योजनेकरिता लाभार्थी समजण्यात येतात.

छगन भुजबळांवर मुंबईत गुन्हा दाखल; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

इतर पात्रता निकषानुसार महिला ही १८ ते ५० वयोगटातील असावी, तिच्यावर कुठल्याही गुन्ह्याची नोंद नसावी तसेच ग्रामीण भागातील महिला असल्यास वार्षिक उत्पन्न ९८ हजार व शहरी विभागाकरिता एक लाख वीस हजार इतकी मर्यादा दिली गेली आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना छोटे व्यवसाय उभारायचे झाल्यास भांडवल सहाय्य होईल तसेच यामुळे आत्मनिर्भर भारत योजनेला देखील बळ मिळू शकते, कारण देशात अनेक महिला गृह उद्योगांनी मोठे योगदान दिल्याचे उदाहरण आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.