Take a fresh look at your lifestyle.

घरभाडे न देणे हा गुन्हा आहे की नाही?… सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : घरभाडे न देणे हा गुन्हा आहे की नाही? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. भाडेकरूच्यावतीने भाडे न देणे हे दिवाणी वादाचे प्रकरण आहे, ते फौजदारी प्रकरण नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही

नीतू सिंह विरुद्ध स्टेट ऑफ यूपी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले. भाडेकरूविरुद्ध कलम 403 (अप्रामाणिकपणे मालमत्तेचा वापर करणे) आणि 415 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचवेळी या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या अर्जावर दिलासा देण्यास नकार दिला होता आणि नोंदणीकृत खटला फेटाळण्यास नकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. भाडेकरूने भाडे न भरल्यास आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयात भाडेकरू विरोधात दाखल केलेला खटला फेटाळताना ही टिप्पणी केली.

भाडे न देणे हा दिवाणी स्वरूपाचा वाद

घरमालकाने भाडेकरूविरुद्ध आयपीसीच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी म्हणाले की, भाडे न देणे हा दिवाणी स्वरूपाचा वाद आहे. सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर फेटाळून लावला आणि भाडे न देणे हा दिवाणी वाद असल्याचे सांगितले. तो फौजदारी खटला होत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.