Take a fresh look at your lifestyle.

Eknath Shinde : ठाकरे सरकारचा आज शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मुंबईत येणार?

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Eknath Shinde शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेचे आमदार फोडून मोठा शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. ३३ आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच गुवाहाटीला दाखल झाले आहे.आता एकनाथ शिंदे हे मुंबईकडे रवाना होणार आहे. राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे.

🔥मोठी बातमी! महाराष्ट्रात संध्याकाळपर्यंत राष्ट्रपती राजवट? राजकीय वर्तुळात खळबळ

एकनाथ शिंदे आपल्यासह ३३ आमदारांना घेऊन आता गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे.सर्व आमदारांना गुवाहाटीमध्ये रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल यांची भेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे आजच भेटायची तयारी केली आहे. स्पेशल विमानानं, गुवाहाटीवरून मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी CISF च्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. विमानतळ ते राजभवन प्रवासाला Cisf ची सुरक्षा असणार आहे.

Best Plans: Airtel चा सर्वात स्वस्त प्लान, दिवसाचा खर्च ५ रुपयांपेक्षा कमी, व्हॅलिडिटीसह हे महत्वाचे बेनेफिट्स

आधीच शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची निवड केली आहे. पण सेनेकडे फक्त १७ आमदार असल्याचे पत्र दिले होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दावा करू शकतात. त्यांच्या दाव्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

💥मोठी बातमी! जन धन खातेधारकांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला थेट खात्यात मिळणार ‘इतकी’ रक्कम

सुरत हे मुंबईपासून जवळ असल्यामुळे मध्यरात्रीच सर्व आमदारांना गुवाहाटीला जाण्याचा प्लॅन रचला. त्यानुसार मध्यरात्रीच सुरतमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांना गुवाहाटीला नेण्यात आलं आहे. आमदारांपर्यंत कोणी पोहोचू नये यासाठी त्यांना सुरतहून आसामच्या गुवाहाटीमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय सुद्धा सोबत होते. रवींद्र चव्हाण आणि मोहित भारतीय हे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे.

होम लोन घेण्याचा विचार करताय? ‘या’ बँका देतात सर्वात स्वस्त कर्ज

गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार यांची जबाबदारी संजय कुटे, मोहित खंबोज, डोंबिवली आमदार चव्हाण यांच्याकडे दिली आहे.या तीन लोकांवर सर्व समन्वय आणि सोबत राहण्याच्या सूचना केल्या आहेत. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खास या तीन लोकांवर जबाबदारी दिली आहे.ऑपरेशन लोटस याची चर्चा रंगली आहे. कंबोज, कुटे आणि चव्हाण हे फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे शिंदे यांच्यासह इतर आमदार फडणवीस समवेत थेट संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.