Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, तर चांदीच्या दरात घसरण, पटापट तपासा आजचे दर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोने-चांदी (Gold silver) दरात सातत्याने दरवाढ होत होती. अखेर आज या दरवाढीला ब्रेक लागला आहे. सोन्याचे दर आज स्थिर आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Rate) प्रतितोळा 48 हजार 200 इतका आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

मात्र दुसरीकडे चांदीच्या (silver Rate) दरात किंचितशी घसरण झाली आहे. शनिवारी चांदीचे दर प्रति किलो 70 हजार रुपये इतके होते. आज त्यामध्ये घसरण होऊन ते प्रति किलो 68900 रुपयांवर पोहोचले आहेत.

हेही वाचा – अत्यंत खळबळजनक! खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, …तर मला फाशी द्या!

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. यामागचं कारण हे रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध सांगितलं जातंय. दोन्ही देशांमधील भयंकर युद्धामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली.

हेही वाचा – रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर, केंद्रातील मोदी सरकारने दिलं मोठं गिप्ट

राज्यातील प्रमुख शहरामधील सोन्याचे दर

दरम्यान, आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 48,200 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 52,590 इतका आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा भाव 48,300 तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52, 690 इतकी आहे. नागपुरात 22 आणि 24 कॅरट सोन्याचा प्रति तोळा दर अनुक्रमे 48250 आणि 52640 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 70 हजार रुपये इतका आहे.

हेही वाचा – रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर, केंद्रातील मोदी सरकारने दिलं मोठं गिप्ट

सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ

रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्यासारख्या मौल्यवान धातुच्या किमती देखील वाढल्या आहोत. दरम्यान येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या सोन्यातील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.