tractor subsidy in maharashtra | ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून मिळणार भरघोस अनुदान, त्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

0
tractor subsidy in maharashtra : शेती आजकाल यंत्रामुळे सोपी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मनुष्यबळ कमी लावावे लागत आहे.
शेतीमध्ये यांत्रिकीकरण आल्यामुळे शेतीची कामे सोपी झाली तसेच लवकर होत आहे. बैलाच्या कामाला वेळ लागतो म्हणून शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणावर जास्त भर आहे. शेतीसाठी महत्वाचं यंत्र म्हणजे ट्रॅक्टर आहे.  राज्य सरकार तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणार आहे.
mahadbt tractor scheme : पैशांअभावी अनेक शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करु शकत नाहीत. राज्य सरकार 50 टक्के अनुदानावर किमतीमध्ये ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी योजना सुरु केली आहे.
Tractor Anudan Yojana Maharashtra : शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरली आहे. ही योजना महाडीबीटी (MahaDBT) मार्फत राबविली जात आहे.  चला तर या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (Tractor Yojana Maharashtra 2023)

tractor anudan mahiti : एवढे अनुदान मिळणार 

20 HP ते 40 HP ट्रॅक्टरसाठी 1 लाख 25 हजार अनुदान दिले जाणार आहे. तर 40 HP ते 70 HP ट्रॅक्टरसाठी देखील 1 लाख 25 हजार रुपये मदत दिली जाईल. यापेक्षा जास्त अनुदान तुम्हाला मिळणार नाही. या योजनेच्या अनुदानाबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. (mahadbt tractor yojana)
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • सातबारा व 8 अ उतारा
निवड झाल्यावर द्यायची कागदपत्रे
  • खरेदी करावयाचा अवजाराचे कोटेशन आणि केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेले तपासणी अहवाल
  • जातीचा दाखला (अनुसूचित जाती व जमातीसाठी)
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसमंती पत्र (mahadbt tractor anudan)
अशाप्रकारे करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवर करावा लागणार आहे. तुम्ही मोबाईलवर देखील अर्ज करू शकता. जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर तुम्ही आपल्या जवळच्या कोणत्याही CSC सेंटर मध्ये म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता.
Leave A Reply

Your email address will not be published.