Take a fresh look at your lifestyle.

सावधान! दोन दिवस तुमच्या घरातील बत्ती होणार गुल, जाणून घ्या कारण…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : मोदी सरकारने (central Government) विविध क्षेत्रात लावलेला खासगीकरणाचा (Private Sector) धडाका थोपवण्यासाठी देशातील अनेक कामगार संघटनांनी (Worker union) पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसलं आहे. येत्या 28 आणि 29 मार्च रोजी भारतीय मजदूर संघ वगळता इतर सर्व मध्यवर्ती कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपात देशभरातील वीज विभागातील कर्मचाऱ्यांचा (electricity worker) सुद्धा समावेश आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

बुधवारी वीज कर्मचारी आणि अभियंत्यांच्या राष्ट्रीय समन्वय समित एक बैठक झाली. या बैठकीत या देशव्यापी संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 28 ते 29 मार्च दरम्यान देशभरात विजेची समस्या निर्माण होऊ शकते, असं सांगण्यात आलंय.

हेही वाचा – रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

या संपात वीज कर्मचाऱ्यांसह उद्योग निहाय कामगार तसेच कर्मचारी संघटना, बँक, विमा उद्योगातील कर्मचारी तसेच कांही अधिकारी संघटना, असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगार तसेच कर्मचारी मिळून 9 कोटींवर कामगार सहभागी होत आहेत.

काय आहेत मागण्या?

हेही वाचा – औरंगाबाद : दोन समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम, त्यानंतर घडलं असं काही…

ऑल इंडिया पॉवर इंजिनीअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी संपाबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, वीज (सुधारणा) विधेयक 2021 मागे घेण्यात यावे, सर्व प्रकारची खाजगीकरण प्रक्रिया थांबवण्यात यावी, या वीज कर्मचारी व अभियंत्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

याचबरोबर, केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेषत: नफा कमावणाऱ्या चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दीव आणि पुद्दुचेरीमधील विजेचे खासगीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा आणि वीज मंडळे विसर्जित केल्यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व वीज कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनअंतर्गत आणावे.

हेही वाचा – भारताने तयार केली जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, अशी करा फक्त 10 हजारात बुक

बँक कर्मचारीही संपावर

खासगीकरणाच्या धोरणाविरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी 28-29 मार्चच्या संपात सहभागी होणार आहेत. बँकांच्या कर्मचारी संघटनांनी 28-29 मार्च रोजी संपावर जाण्याचे आवाहन केले आहे. संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. सरकारी बँकांचे खासगीकरण आणि बँक अधिनियमन सुधारणा विधेयक 2021 च्या विरोधात बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.