Take a fresh look at your lifestyle.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जाणून घ्या भारतीय रेल्वेचा मोठा प्लॅन

0
maher

नागपूर – नागपुर ते मुंबई रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 736 किलोमीटरचा प्रवास आता केवळ 5 तासात करता येणार आहे. नुकताच हायस्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिडेटने रेल्वे बोर्डाकडे सादर केला. त्यामुळे आता प्रवासाचे तास कमी होणार आहेत.

काय आहे प्रकल्प?

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ‘लाइट डिटेक्शन अॅण्ड रेंजिंग सर्व्हे’ (लिडार) तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्टोबर 2021 मध्ये विमानाद्वारे भूसर्व्हेक्षण केले होते. त्यामध्ये जमिन व इतर आवश्यक माहितीचा समावेश होता. त्याचा विस्तृत आराखडा कार्पोरेशनने तयार केला. या आराखड्यानुसार समृद्धी महामार्गाला समांतर हाय स्पीड रेल कॉरिडॉर चालवण्याची ही योजना आहे. सध्या समृद्धी एक्सप्रेस मार्गालगत बुलेट ट्रेनच्या या प्रकाल्पावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच रेल्वे बोर्ड सुद्धा या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवेल, असे म्हटले जात आहे.

केवळ 5 तासात नागपुरातून मुंबईत –

सध्या नागपुर ते मुंबई प्रवासासाठी 12 ते 15 तास लागतात. हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरमुळे हा प्रवास 5 तासात होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, समृद्धी महामार्गाला समांतर बुलेट ट्रेन राहणार असल्यामुळे कमीत कमी जागेत हा प्रकल्प पुर्ण करण्याची योजना तयार केली जात आहे.

येथे थांबेल रेल्वे 

ही बुलेट ट्रेन दहा जिल्ह्यातून जाणार आहे. तब्बल 250 किलोमीटर वेगाने धावणारी ही ट्रेन केवळ एका मिनीटासाठी सुमारे 14 स्थानकांवर थांबेल. ही ट्रेन अजनी रेल्वे स्थानकावरून सुटेल. त्यानंतर खापरी, वर्धा, पुलगाव, कारंज लाड, मालेगाव, जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या स्थानकांवर थांबेल.

Leave A Reply

Your email address will not be published.