Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी; महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मोठा पराक्रम!

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – राज्याच्या राजकारणात सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडतांना दिसून येत आहेत. सध्या तरी अनेक खळबळजनक आरोप सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहेत. महत्वाचं म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजेल असे अनेक नवनवीन खुलासे सध्या होत आहेत. दरम्यान, एका अधिकृत न्यूज चॅनेलने एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यात महाकविकास आघाडीच्या नेत्यांची पोलखोल झाल्याचं समोर आलंय.

शेवटच्या षटकाचा व्हिडीओ पहाच! अखेरच्या चेंडूवर महेंद्रसिंग धोनीची मॅच फिनिशिंग खेळी; चेन्नईचा थरारक विजय

कोरोना काळात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. त्याच काळात महाविकास आघाडीतील तब्बल 17 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, लाखो रुपयांची बिलं सरकारी तिजोरीतून भरली असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात देशासह राज्यातील नागरिक मोठ्या कोरोना संकटात होते. असं असतानाच, सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागलं. मात्र, महाविकास आघाडीच्या 17 मंत्र्यांनी मात्र, 2 वर्षांत खासगी रुग्णालयातील उपचार घेतले आणि उपचाराच्या नावाखाली सरकारी तिजोरीतून लाखोंचं बिल भरलं!

भररस्त्यात BJP नेत्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या; हल्लेखोर फरार

सरकारी रुग्णालयांवर भरोसा नाय का?

2 वर्षांत खासगी रुग्णालयातील उपचार घेतले आणि 1 कोटी 39 लाख रुपयांची बिले सरकारी तिजोरीतून दिली.
यामध्ये सर्वाधिक मंत्री हे राष्ट्रवादीचे आहेत. राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी काँग्रेसच्या 6 आणि शिवसेनेच्या 3 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीतून पैसे खर्च केले आहेत. स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपेंचंच उपचारासाठी तब्बल 34 लाखांचं बिल झाले आहे. त्यामुळे या मंत्र्यांना सरकारी रुग्णालयांवर भरोसा नाय का असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय.

Alert! महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस! वादळ आणि सोसाट्याचा वाराही हजेरी लावणार

खासगी रुग्णालयात उपचार घेणारे हे आघाडीवर मंत्री

  • सार्वजनिक आरोग्यमंंत्री राजेश टोपे – 34 लाख 40930
  • ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत – 17 लाख 630,879
  • ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ- 14 लाख 56,604
  • महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार – 12 लाख 56,748
  • गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड – 11 लाख 76,278
  • अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ -9 लाख 3,401
  • पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार – 8 लाख 71,890
  • जलसंपदामंत्री जयंत पाटील – 7 लाख 30,513
  • उद्योगमंत्री सुभाष देसाई – 6 लाख 97,293
  • परिवहनमंंत्री अनिल परब – 6 लाख 79,606

दोन लाखांपर्यंत उपचार घेतलेल्या मंत्र्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण , पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. तर एक लाखापर्यंत उपचार आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी घेतलेत. तर 50 हजारच्या जवळपास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपचार घेतले आहेत.

तुमच्या जिल्ह्याचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

या हॉस्पिटलमध्ये घेतले उपचार

बॉम्बे हॉस्पिटल , लिलावती हॉस्पिटल, ब्रीच कँण्डी हॉस्पिटल ,जसलोक हॉस्पिटल ,फोर्टिस हॉस्पिटल, अवंती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल , केईएम हॉस्पिटल ,आधार हॉस्पिटल आदी नावाजलेल्या रुग्णालायता मंत्र्यांनी उपचार घेतल्याचे पुढे आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.