Take a fresh look at your lifestyle.

दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न

0
maher

अनिल पांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : दारूसाठी पैसे मागितले मात्र, ते देण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाचा संगमनेर रस्त्यावरील दारूच्या दुकानाजवळ भर दुपारी खून करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर रस्त्यावरील एका दारूच्या दुकानाजवळ तन्वीर छोटू शाह (रा. वॉर्ड नंबर २, श्रीरामपूर ) व त्याच्या सोबत असणाऱ्या दोघांनी अरमान लियाकत पठाण (रा. अहिल्यादेवी नगर, वार्ड नंबर २, श्रीरामपूर ) यास दारूसाठी पैसे मागितले. त्यांनी ते दिले नाही म्हणून त्यांना लाकडी दांड्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली आहे. याबाबत अरमान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.