Take a fresh look at your lifestyle.

Important News – TVS ची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर झाली स्वस्त, फक्त ‘इतक्या’ किंमतीत खरेदी करा

ओटीटी न्यूज नेटवर्क –

मुंबई – TVS NTorq 125 XT Price Cut : पेट्रोल डिझेल सारख्या इंधनांच्या किमतीत सतत वाढ होत आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत देखील भारतीय टू व्हीलर उत्पादक कंपनी टीव्हीएस देशांतर्गत बाजारात चांगली कामगिरी करतांना दिसत आहे. तसेच निर्यातीत देखील कंपनीने चांगलीच झेप घेतली आहे. कंपनीने मे २०२२ मध्ये केलेल्या विक्रीचे आकडे अलिकडेच जाहीर केले याहेत. त्यानुसार या महिन्यात त्यांच्या एकूण देशांतर्गत विक्रीत ८१.५ टक्के वाढ झाली आहे. electric vehicle

IND Vs SA 2nd T20: क्रिकेट मॅचचे तिकीट खरेदी करणाऱ्या प्रेक्षकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

कंपनीने मे महिन्यात ३ लाख २ हजार ९८२ टू व्हीलर्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने १,६६,८८९ टू व्हीलर्स विकल्या होत्या. कंपनीला या महिन्यात (जून) आपला सेल वाढवायचा आहे. त्यामुळे टीव्हीएसने त्यांच्या लोकप्रिय स्कूटरच्या किंमतीत कपात केली आहे. या स्कूटरचं नाव आहे टीव्हीएस एनटॉर्क १२५ एक्सटी (TVS NTorq 125 XT). टीव्हीएसने त्यांची १२५ सीसी क्षमतेची स्पोर्टी स्कूटर NTorq चं हे नवीन XT व्हेरिएंट अलिकडेच लाँच केलं होतं. TVS

क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करा या सोप्या पद्धतीने; यूजर्सना होणार मोठा फायदा

TVS NTorq 125 XT ही स्कूटर लाँच करताना कंपनीने या स्कूटरची किंमत (एक्स शोरूम) १.०३ लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता अवघ्या एका महिन्यात कंपनीने या स्कूटरची किंमत ६ हजार रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे आता या स्कूटरची किंमत ९७,०६१ रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक ही स्कूटर खरेदी करतील, असा कंपनीला विश्वास आहे.

भन्नाट ऑफर! कारसाठी आता ७ लाख रुपये असण्याची गरज नाही; १ लाखाच्या आत घरी आणा Maruti WagonR

एनटॉर्क १२५ एक्सटी ही स्कूटर बाजारात Activa 125, Suzuki Avenis आणि Honda Grazia 125 सारख्या १२५ सीसी सेगमेंटमधल्या स्कूटर्सना टक्कर देत आहे. दरम्यान, कंपनीने या स्कूटरची किंमत अचानक कमी का केली याबाबत काही सांगितलेलं नाही. मात्र ग्राहकांसाठी हा एक चांगला निर्णय आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की, एक्सटी हे या स्कूटरच्या लाईनअपमधलं सर्वात टॉप व्हेरिएंट आहे. ६ हजार रुपयांनी किंमत कमी केली असली तरी कंपनीच्या दुसऱ्या सर्वात महागडं व्हेरिएंट असलेल्या रेसएक्सपी (TVS NTorq 125) पेक्षा ही किंमत ८ हजार रुपयांनी जास्त आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.