Take a fresh look at your lifestyle.

TVS लॉन्च करणार स्वस्त क्रूजर बाइक, Royal Enfield ला टक्कर, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – TVS Zeppelin R Launch Date भारतीय वाहन निर्माती कंपनी टीव्हीएस मोटर सध्या टू व्हीलर्स मार्केटमध्ये उत्तम कागगिरी करत आहे. मे २०२२ मधील कंपनीच्या विक्रीचे आकडे पाहता कंपनीचा बाजारात चांगलाच दबदबा असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या एकूण देशांतर्गत विक्रीत ८१.५ टक्के वाढ झाली आहे.

बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी; कोणाचा किती टक्के लागला निकाल; लगेच तपासा

कंपनीने गेल्या महिन्यात (मे २०२२) ३,०२,९८२ दुचाकींची विक्री नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने देशांतर्गत बाजारात एकूण १,६६,८८९ दुचाकींची विक्री केली होती. कंपनी आता बाजारात अजून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच कंपनी आता किफायतशीर बाइक्सनंतर थोड्या प्रीमियम सेगमेंटमधल्या बाइक्सवर लक्ष देत आहे. कम्युटर सेगमेंटच्या मोटरसायकलसह बजेट स्पोर्ट्स सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करणारी ही कंपनी मोटर लवकरच क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये TVS Zeppelin R ही नवीन मोटरसायकल लॉन्च करणार आहे.

Realme चा 5G स्मार्टफोन अवघ्या 500 रुपयात! कसं ते जाणून घ्या

टीव्हीएसच्या Zeppelin R या बाइकचं कॉन्सेप्ट मॉडेल २०१८ च्या ऑटो एक्सपोमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आलं होतं. ही बाइक तेव्हाच अनेकांना आवडली होती. अनेक जण या बाइकची वाट पाहात आहेत. मात्र कंपनीने या बाइकच्या लाँचिंगबाबत कोणतीही घोषणा गेल्या तीन वर्षात केली नाही. आता मात्र ही बाइक लाँच होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

आधार कार्डवरील फोटो आवडला नाही? या सोप्या प्रोसेसने सहज करा बदल

कंपनीने या बाइकच्या लाँचिंगची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी कंपनीने या बाइकवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी TVS Zeppelin R चा संभाव्य लूक कसा असेल, त्यात कोणकोणते फीचर्स मिळतील, बाइकची किंमत किती रुपये असेल, याबाबतची माहिती घेऊन आलो आहोत.

तुमचा CIBIL Score कमी असला तरी घेता येईल पर्सनल लोन, फक्त ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

माईल्ड हायब्रिड टेक्नोलॉजीचा वापर

TVS Zeppelin R या बाइकमध्ये 220cc क्षमतेचं सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन दिलं जाऊ शकतं, जे माईल्ड हायब्रिड टेक्नोलॉजीसह सुसज्ज असेल. तसेच या बाइकमध्ये ४८ व्होल्टची लिथियम-आयन बॅटरी दिली जाईल. बाइकचं इंजिन 20bhp पॉवर आणि 18.5Nm टॉर्क जनरेट करू शकेल. या क्रूझर बाइकमध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स मिळू शकतो. या बाइकचं डिझाईन आकर्षक करण्यावर कंपनीचा फोकस असेल. त्यामुळेच यात एलईडी हेडलॅम्प, स्प्लिट सीट, फ्लॅट ट्रॅक स्टाईल हँडलबार, १७ इंचांचं फ्रंट व्हील आणि १५ इंचांचं बॅक व्हील दिलं जाईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.