Take a fresh look at your lifestyle.

‘मातोश्री’वरून बोलावलं तर एकनाथ शिंदेंसह जाणार; सेनेच्या ‘या’ बंडखोर आमदाराचं वक्तव्य

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

शिर्डी – शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले आहे. पण अजूनही शिवसेनेच्या बंडखोरांना मातोश्रीकडून बोलावण्यात यावं अशी इच्छा आहे. ‘आमची इच्छा आहे, आम्हाला फोन यावा आणि मातोश्रीवर आम्हाला बोलवावं, मात्र मुख्यमंत्री शिंदे यांना बोलवलं तरच सर्वजण सोबत जावू, एकटा जाणार नाही’ असं वक्तव्य नांदगाव मतदारसंघाचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी केलं आहे.

शिंदे सरकारचा राऊतांना दणका, किरीट सोमय्यांना दिलासा

‘राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वच बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. आमदार सुहास कांदे देखील आपल्या नांदगाव मतदारसंघात परतले. त्यानंतर कांदे हे सपत्निक साईबाबा मंदिरात दर्शनासाठी शिर्डीत आले होते. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आपण साईबाबांना नवस केला होता आणि तो फेडण्यासाठी शिर्डीत बाबांच्या दरबारी आल्याचं सुहास कांदे यांनी साई दर्शनानंतर सांगितलं.

‘आम्ही गुवाहाटीत होतो, त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत असा नवसं साईबाबांना केला होता. बाबांनी माझ्या झोळीत भेट टाकली आणि मला न्याय दिला. माझा अगदी जवळचा व्यक्ती मुख्यमंत्री झाला. त्यामुळे साईबाबांचे आभार मानण्यासाठी नवसपुर्तीसाठी सपत्निक दर्शनासाठी आलो, अशी प्रतिक्रिया सुहास कांदे यांनी दिली.

निसर्गाचा प्रकोप! ढगफुटी, प्रलय, भूस्खलन… कुल्लू, शिमल्यात हाहाकार

मातोश्रीवरुन फोन आला आणि तुम्हाला बोलावलं तर या प्रश्नावर उत्तर देतांना आमदार कांदे म्हणाले की, आम्हाला आजही मातोश्रीवर बोलवावे असे वाटते, परंतु बोलावलं तर एकटा जाणार नाही, सर्वजण सोबत जावू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवले तर आम्ही नक्की जावू मात्र एकटा जाणार नाही’,असे वक्तव्य कांदे यांनी केलं.

‘महाराष्ट्र राज्य शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याचा विकास व्हावा, अस‌ साकडं साईबाबांना घातलं. मला मंत्रिपदाची जबाबदारी देवो, दिली तर तरी चांगले, नाही दिली तरी आपली हरकत नाही. माझा माणूस ज्यांच्यावर मी खूप प्रेम केले, त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं आहे, आता साईबाबा जी जबाबदारी देतील, ती मी स्वीकारेल असं देखील कांदे यांनी म्हटलं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.