Take a fresh look at your lifestyle.

राजकीय गदारोळात उद्धव ठाकरेंची एक कृती अन् संपूर्ण महाराष्ट्र संभ्रमात

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेचे ३५ हून अधिक आमदार फोडले आणि राज्याच्या राजकारण खळबळ उडवून दिली. शिंदे हे बंडखोर आमदारांसह वेगळा गट स्थापन करून सत्तास्थापनेसाठी भाजपला समर्थन देणार असल्याची चर्चा आता सुरू झालीय. मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ हे आपलं शासकीय निवासस्थानही आता सोडलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळणार, हे आता हळूहळू स्पष्ट होत चाललं आहे. मात्र या सगळ्या गदारोळात उद्धव यांच्या एका कृतीने अवघा महाराष्ट्र बुचकळ्यात पडला आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे.

राज्यात सोमवारी विधानपरिषद निवडणुकीचं मतदान पूर्ण होऊन निकाल लागला आणि भाजपने अनपेक्षितरित्या पाचवी जागाही जिंकली. हक्काची पुरेशी मते नसतानाही भाजपने ही जागा जिंकल्याने महाविकास आघाडीची मते फुटल्याचं उघड झालं. खरी खळबळ उडाली ती शिवसेनेच्याही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आल्यानंतर…. त्यातच रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांनी मुंबई सोडून थेट गुजरातमधील सूरत शहर गाठलं. शिंदे यांनी यावेळी आपल्यासोबत शिवसेनेत नाराज असलेल्या २० ते २२ आमदारांची मोट बांधली होती.

एकनाथ शिंदे हे नाराज आमदारांना घेऊन राज्याबाहेर गेल्याचं कळताच शिवसेनेच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आणि मध्यरात्रीच वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला मुंबईतील काही आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दुपारी १२ वाजता पुन्हा शिवसेना आमदारांची बैठक बोलावली गेली. परंतु तोपर्यंत अनेक आमदार शिंदेंना सामील होण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र तरीही उद्धव ठाकरे यांच्या हातात एक संधी होती आणि तीच संधी उद्धव ठाकरे यांनी का दवडली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

उद्धव ठाकरेंकडे नेमकी कोणती संधी होती?

पक्षात मतभेद झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावला खरा, मात्र पक्षातून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करण्यासाठी शिंदे त्यांच्यासोबत एकूण आमदारांच्या दोन तृतीयांश आमदार असणं गरजेचं होतं. विधानसभेत शिवसेनेचे एकूण ५५ आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना यातील कमीत कमी ३७ आमदार फोडण्याची गरज होती. पहिल्या दिवशी जेव्हा मंत्री शिंदे हे राज्याबाहेर गेले तेव्हा त्यांच्याकडे शिवसेनेचे साधारण २० च्या आसपास आमदार होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपली सगळी यंत्रणा वापरून उर्वरित आमदारांना जर मुंबईतच रोखून ठेवलं असतं तर शिंदे यांची मोठी अडचण झाली असती.

Comments are closed.