Take a fresh look at your lifestyle.

BREAKING :शिवसेना नरमली; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देणार एनडीएला पाठिंबा?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी सेनेतल्या खासदारांची इच्छा आहे. त्यामुळे एक राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवेळी आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही फुटतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांच्या दबावापुढे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघार घेतली असल्याचं चित्र आहे. येणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. याविषयी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे.

भारतीय रुपया पुन्हा होरपळला; भांडवली बाजारातील चलन गुंतवणुकीचा थेट परिणाम

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावाअशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. शेवटी खासदारांच्या शब्दाला उद्धव ठाकरे यांनी मान दिला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असं सूत्रांनी सांगितलंय.

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लवकरच, याविषयी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडूनअधिकृत माहिती जाहीर होणार आहे. पण त्याआधीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेचा कौल लक्षात घेता एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला असल्याची माहिती दिली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.