Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा; चंद्रपुरात मोठ्या क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri petroleum minister) यांनी चंद्रपुरासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. चंद्रपूरमध्ये वार्षिक 20 मिलियन मेट्रिक टन क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी (Refinery) उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पक्षाने पुरी यांची नियुक्ती केली आहे.

पेट्रोलियम विभागाने वार्षिक रिफायनिंग क्षमता 252 वरून 400 मिलियन मेट्रिक टन केली आहे, अशी माहिती देत त्यांनी रत्नागिरी येथील प्रकल्प थांबवल्याबद्दल मागील राज्य सरकारवर टीका केली. क्षमता वाढवण्याच्या या प्रयत्नात पुरी यांनी चंद्रपूरमध्ये 20 मिलियन मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी स्थापन केली जाईल, असे आश्वासन दिले. चंद्रपूर भाजपच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

पहिल्यांदाच भारतीय महिलांनी इंग्लंडच्या मातीत मिळवला मालिकाविजय; ३३३ धावांचा उभारला डोंगर

राज्यात भाजपने गमावलेल्या लोकसभेच्या जागा परत मिळवण्यासाठी पक्षाने विशेष मोहीम सुरू केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती अनुकूल असताना चंद्रपूरची जागा भाजपने गमावली होती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राज्यात काँग्रेसला यश मिळाले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी लोकसभा मतदारसंघात तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी चंद्रपुरात 20 मिलियन मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभारणार असल्याची घोषणा केली, त्याचवेळी कोकणातील रिफायनरी रखडल्याबद्दलही त्यांनी नाराजीही व्यक्त केली. मात्र पुरीच्या घोषणेनंतर कोकण रिफायनरीचे भवितव्य काय? चंद्रपुरात रिफायनरी उभारली तर कोकणात रिफायनरी उभारणार की नाही? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.