Take a fresh look at your lifestyle.

श्री विजय पवार लिखित ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे – रुद्र एंटरप्राइजेस / पुस्तकविश्व प्रकाशित , श्री विजय पवार लिखित ‘बाराखडी उद्योजकतेची’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ अनावरणाचा सोहळा मा.सतिश पवार सर यांच्या शुभहस्ते (डायरेक्टर- स्टर्लिंग सिस्टीम, पुणे) पार पडला. यावेळी पुस्तकाचे लेखक विजय पवार सर,नवनाथ जगताप सर, सचिन म्हसे सर , अभिजीत सोनवणे सर, विकास आगवणे सर तसेच टीम पुस्तकविश्व आदी उपस्थित होते.

दरम्यान, या दिग्गजांच्या उपस्थितीत आजच्या रम्य पुस्तक कशासाठी- उद्योजकता क्षेत्राला स्वतःचं करिअर म्हणून निवडलेल्या ध्येयवेड्या वाटसरुंना दिशादर्शक म्हणून मदत करण्यासाठी !
पुस्तक कोणासाठी- स्वतःच्या स्वप्नांना आपल्या अडचणींपेक्षा मोठं मानून ध्येयपूर्तीसाठी झटणाऱ्या उद्योजकांसाठी
पुस्तकंच का – आजपर्यंतच्या उद्योजकीय प्रवासातील आवश्यक त्या गोष्टींची माहिती कोपर्या कोपर्यात पोहचवण्यासाठी !

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

उद्योग व्यवसाय म्हणजे काय ? स्टार्टअप्स आणि पारंपरिक उद्योग व्यवसाय यात फरक कोणता ? उद्योग व्यवसाय उभारणी करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या ? उद्योग व्यवसायाची निवड कशी करावी ? भांडवल उभारणीचे मार्ग कोणते ? उद्योग व्यवसायाच्या नाव, लोगोची निवड करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या? आपल्या व्यवसायाचा ब्रँड कसा बनवावा? व्यवसाय करताना आर्थिक शहाणपणा कसा असावा? व्यवसायातील भागिदारी , व्यवसाय व्यवस्थापन, येणाऱ्या अडचणी त्यावरील मार्ग इ. उद्योजकतेशी निगडीत सर्वसमावेशक प्रत्येक गोष्टीची माहिती सहजसोप्या भाषेत देणारं आणि प्रत्येक संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करणारं रोडमॅप ठरणारं हे पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती येईल !

येतोबसशुरुवातहै
बाराखडी_उद्योजकतेची
लेखक_ विजय गोपाळराव पवार
प्रकाशक_पुस्तकविश्व- नवनाथ जगताप सर संध्याकाळी पुस्तकविश्व कोथरूड येथे पार पडला.

Comments are closed.