Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! बारावीच्या इंग्रजी पेपरची चक्क ५०० रुपयांना विक्री; तब्बल २४ जिल्ह्यातील परीक्षा रद्द होणार!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

लखनौ – सध्या देशभरातील दहावी आणि बारावीच्या (Class 12) परीक्षा सुरु आहेत. परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या अनेक घटना विविध माध्यमांद्वारे समोर येतात. गेल्या काही दिवसांपूर्वी याच प्रकारे परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार महाराष्ट्रातही उघड झाले होते. अशातच, आता उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावीच्या परीक्षा सुरु असताना त्यात उत्तर प्रदेश बोर्डाचा इंग्रजीचा पेपर लीक झाला आहे. धक्कादायक म्हणजे बाहेर या पेपरची 500 रुपयांना विक्री होत असल्याचं देखील समोर आलंय. हा पेपर सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आला होता. यानंतर उत्तर प्रदेशच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेश बोर्डाचा (UP Board) बारावीचा पेपर फुटल्याचं समोर आलं असून हा गैरप्रकार घडलेला बारावीतील इंग्रजी विषयाचा पेपर आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा पेपर फोडल्यानंतर चक्क 500 रुपये असा विकण्यात आल्याचं देखील समोर आलं आहे. उत्तर प्रदेश बोर्डाचा बारावीचा इंग्रजीचा पेपर लीक झाल्याचं समोर आल्यानंतर याची माहिती शिक्षणमंत्री गुलाबो देवी यांना देण्यात आली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार 24 जिल्ह्यातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आग्रा, मैनपुरी, मथुरा, गाझियाबाद, अलीगढ तसेच बागपत या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. सदर प्रकरणाची चौकशी एसटीएफला देण्यात आली असून दोषींवर रासुका लावण्यात येणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.