Take a fresh look at your lifestyle.

Important News एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; आता रोख पैसे नसले तरीही ‘असं’ मिळणार तिकीट

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

पुणे : Important News राज्य परिवहन महामंडळाने सुमारे पाच हजार नव्या स्वाईप मशिनची खरेदी केली आहे. प्रवाशांना आता फोन पे, गुगल आदी ‘युपीआय’द्वारे तिकीट काढता येणार आहे.

पहिल्या टप्प्यात सात एसटी विभागांना नवे स्वाईप मशिन देण्यात आले. जुलै महिन्यात उर्वरित विभागांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांना रोख रक्कम जवळ न बाळगता देखील एसटी प्रवास करता येणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात तृणमूल काँग्रेसची एन्ट्री, ममता दीदींची थेट आमदारांना ऑफर!

एसटी प्रशासनाने काही महिन्यापूर्वी स्वाईप मशिनद्वारे तिकीट देण्याची पद्धत सुरू केली. मात्र, त्यावेळी केवळ डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच तिकीट दिले जात होते. यात देखील काही अडचण निर्माण होत होत्या.

अनेकदा या मशिन बंद पडल्याच्या घटना देखील अनेक विभागांत घडल्या. हे लक्षात घेत एसटी प्रशासनाने नव्या प्रणालीत आवश्यक तो बदल केला आहे.

राजकीय गदारोळात उद्धव ठाकरेंची एक कृती अन् संपूर्ण महाराष्ट्र संभ्रमात

पूर्वीच्या तुलनेने ही प्रणाली अद्ययावत झाली आहे. शिवाय नव्या मशिनमध्ये ‘युपीआय’ची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना फोन पे द्वारे देखील तिकीट काढता येणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.