Take a fresh look at your lifestyle.

UPI पेमेंट पासून ते गॅसच्या किमतीपर्यत अनेक बदल लागू; तुमच्या खिशावर होणार ‘असा’ परिणाम

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच कालपासून अनेक मोठे बदल झाले आहेत ज्याचा संबंध थेट तुमच्या खिशाशी संबंधित आहेत. यामध्ये गॅसच्या किमती, बँक सुट्ट्या इत्यादींचा समावेश आहे. अशात या बदलांशी संबंधित महत्त्वाची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्ही स्वतःला कोणत्याही अचानक आलेल्या संकटापासून वाचवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया आजपासून लागू करण्यात आलेले 4 मोठे बदल जे तुम्हाला प्रभावित करतील.

BREAKING : भर सभेत हाणामारी, ‘चौरंग करून घरी पाठवेन’, राज ठाकरेंनी सुनावले

आजपासून झालेल्या बदलांमधील महत्त्वाचा बदल म्हणजे UPI पेमेंट्समधून गुंतवणूक मर्यादा वाढवणे. SEBI च्या नवीन नियमांनुसार, 1 मे पासून, जर तुम्हाला UPI द्वारे कोणत्याही IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत बोली लावू शकता. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 2018 मध्ये, UPI ला IPO मध्ये गुंतवणुकीसाठी मान्यता देण्यात आली होती, जी 1 जुलै 2019 पासून लागू आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की LIC चा IPO 4 मे रोजी येणार आहे आणि सरकार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना त्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

IPL 2022 अंपायरने तोडले चहलचे हृदय तर सूर्यकुमारने मारली मिठी; हा VIDEO पाहाच

मे महिन्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. याशिवाय बँकांना या महिन्यात विविध ठिकाणी 13 दिवस सुट्टी आहे. विशेष म्हणजे 1 तारखेला कामगार दिन, 2 तारखेला परशुराम जयंती आणि 3 तारखेला ईद या दिवशी अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील.

एलपीजी सिलेंडर महाग

तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी गॅसच्या किमतीत काही बदल करतात. गेल्या महिन्याच्या 1 तारखेला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या महिन्यात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

IMPORTANT: तुमचं Pan Card वापरून इतर कोणी loan घेतलंय का? ‘या’ सोप्या पद्धतीने तपासा

Leave A Reply

Your email address will not be published.