Take a fresh look at your lifestyle.

UPSC CSE Result मोठी बातमी! UPSC 2021 परीक्षेचा निकाल अखेर जाहीर; असा चेक करा निकाल

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई -UPSC CSE Result प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा (UPSC Mains Exam 2022) 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आला. 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या आणि 26 मे रोजी संपलेल्या परीक्षेची मुलाखत (UPSC Interview 2022) ही शेवटची फेरी होती. त्यानुसार आता UPSC 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर आणखी 5 रुपयांनी कमी होण्याची शक्यता; राज्यसरकार दिलासा देणार?

UPSC तर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये श्रुती शर्माने ऑल इंडिया रँक 1 आला आहे. Indian Administrative Service; Indian Foreign Service, Indian Police Service and Central Services, Group ‘A’ and Group ‘B’ या विभागांसाठी उमेदवारांची निवड केली आहे. प्रिलिम्स, मेन्स आणि त्यानंतर मुलाखतीच्या सर्व परीक्षा पास जरून UPSC तर्फे देशातून 685 उमेदवारांना अपॉईंट करण्यात येणार आहे.

तुमचं PAN Card इतर कोणी वापरतंय का? अशी तपासा पॅन कार्ड हिस्ट्री

यामध्ये 244 उमेदवार हे खुल्या प्रवर्गातील आहेत तर 73 उमेदवार हे EWS प्रवर्गातील आहेत. 203 उमेदवार हे OBC प्रवर्गातील आहेत तर 105 उमेदवार हे SC प्रवर्गातील आहेत. ST प्रवर्गातील 60 उमेदवार आहेत असे एकूण 685 उमेदवार हे सिव्हिल सर्व्हिसेससाठी अपॉईंट करण्यात येणार आहेत. तसंच UPSC तर्फे 63 उमेदवारांना रिझर्व्ह विभागात ठेवण्यात आलं आहे.

IPL 2022 Final : आयपीएलमध्ये घडला इतिहास; राजस्थानची 32.5 कोटींची गुंतवणूक, Hardik Pandya ने केली ‘झिरो’

आज जाहीर झालेल्या अंतिम निकालात श्रुती शर्माने ऑल इंडिया रँक 1 मिळवला आहे. या वर्षी सर्व टॉप तीन पोझिशन्स मुली उमेदवारांनी मिळवल्या आहेत. श्रुती सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे आणि ती जामिया मिलिया इस्लामिया निवासी कोचिंग अकादमीमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे.

असा चेक करा निकाल
अधिकृत वेबसाइटला भेट द्या — upsc.gov.in

मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या ‘UPSC नागरी सेवा अंतिम निकाल 2021’ या लिंकवर क्लिक करा.

यानंतर स्क्रीनवर PDF फाइलमध्ये दिसेल

डाउनलोड करा

Comments are closed.