Take a fresh look at your lifestyle.

सेकंड हॅन्ड Two Wheeler चा बंपर sale! केवळ १६ हजारांत मिळतेय Activa तर २० हजारांत मिळतेय Pulsar

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली -स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी असावी अशी प्रत्येकाची उच्च असते. बऱ्याचदा आर्थिक अडचण तसेच बजेट कमी असल्या कारणाने अनेकांना नवीन स्कूटर किंवा बाईक खरेदी करणे शक्य होत नाही. अशा वेळी Second Hand गाड्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल पाहायला मिळतो. जर तुमचे देखील बजेट कमी असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. फेसबुक मार्केटप्लेस (Facebook Marketplace) या ठिकाणी तुम्ही तुमच्या पसंतीची सेकंड हॅन्ड टू-व्हीलर खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. फेसबुक मार्केट प्लेसवर बजाज पल्सर (Bajaj Pulsar), हीरो स्पलेंडर(Hero Splendor), होंडा ऍक्टिवा(Honda Activa) , टीवीएस अपाचे (TVS Apache) या टू-व्हीलर्सचे जुने मॉडल खूपच कमी किंमतीत विक्री केले जात आहे. त्यामुळे तुम्हांलाही सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करायची असेल तर ही सुवर्णसंधी दवडू नका.

KGF-2 रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या KGF च्या खऱ्या खाणीची कहाणी वाचाच; जिथून निघालं होतं तब्बल 900 टन सोनं

फेसबुक मार्केट काय आहे


हे फेसबुकचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी जुन्या गाड्या खरेदी करू शकतात तसेच विकू शकतात. हे एकदम ओएलएक्स प्रमाणे आहे. तुम्ही वाहन विकणाऱ्या व्यक्तीसोबत थेट बोलू शकतात.

ग्राहकांना मोठा झटका! एका रात्रीत बदलली Maruti Alto ची किंमत, ‘या’ ३ व्हेरियंट्सची विक्री झाली बंद; पाहा नव्या किंमती

Facebook Marketplace वर कसे कराल खरेदी


तुमच्या पीसी किंवा फेसबुक अॅपवरून लॉग इन करा. या ठिकाणी डाव्या साइड तिसऱ्या नंबरवर मार्केट ऑप्शन दिसेल. यावर क्लिक किंवा टॅप करा. या ठिकाणी कॅटेगरीतील Vehicles वर क्लिक करा. याशिवाय, प्राइस सेक्शनवर आपल्या बजेट नुसार प्राइस सेट करा. या ठिकाणी फिल्टर ऑप्शन वर लिमिट सेट करू शकता. तुम्ही थेट कॅटेगरीत जावून बाइकच्या ऑप्शनला सिलेक्ट करू शकता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

स्वस्तात विकली जाताहेत जुन्या टू-व्हीलर्स


फेसबुक मार्केटप्लेसवर ज्यावेळी आम्ही १५ हजार ते २५ हजार रुपयांदरम्यान प्राइस लिमिट सेट केली. त्यावेळी आम्हाला जे ऑप्शन दिसले त्यात होंडा अॅक्टिवाचे २००९ चे मॉडल १५ हजार ५०० रुपयांच्या किंमतीत विक्री साठी उपलब्ध दिसले. बजाज पल्सर १५० चे २०१० चे मॉडल २० हजार रुपयांच्या किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध दिसले. तर टीव्हीएस अपाचे १६० चे २०१० चे मॉडल २२ हजार रुपयाच्या किंमतीत उपलब्ध दिसले. याशिवाय, हिरो स्प्लेंडरला स्वस्त किंमतीत खरेदी करू शकतात.

केवळ ‘या’ टिप्स फॉलो करा आणि त्वरित मिळवा Home Loan! कोणतीही बँक देणार नाही नकार

फसवणुकीपासून सावधान!
फेसबुक मार्केटप्लेस हे ओएलएक्स सारखे आहे. या ठिकाणी सुद्धा अलर्ट राहणे गरजेचे आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार करताना तुमची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

Leave A Reply

Your email address will not be published.