Take a fresh look at your lifestyle.

आता १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण; ‘या’ तारखेपासून होणार प्रारंभ  

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोरोना महमारीची तिसरी लाट जरी ओसरली असली तरी देखील अद्यापही देशभरात नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू देखील सुरूच आहेत. त्यामुळे कोरोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे.

मुले सुरक्षित तर देश सुरक्षित

आरोग्यमंत्री मांडविया यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे कि, “मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे!  तसेच ६० वर्षांवरील वृद्धांनाही खबरदारीचा डोस किंवा बूस्टर डोस दिला जाणार आहे. ‘मुलांच्या कुटुंबीयांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करतो’, असे आरोग्यमंत्री मांडवीय म्हणाले. आहेत. त्यामुळे आता बुधवारापसून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु केले जाणार आहे.

बुधवारापसून मुलांना लस दिली जाणार

आता १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी देशभरात लसीकरण सुरू केले जाणार आहे. या मुलांना कोरोना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या बुधवारापसून म्हणजेच १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही कोरोनावरील लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. या वर्षीच्या सुरूवातीला १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.