Take a fresh look at your lifestyle.

Validity Plans : वाह! २२ रुपयांच्या ‘या’ प्लानसमोर Jio -Airtel सुद्धा फेल, मिळते तब्बल ३ महिन्यांची व्हॅलिडिटी

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – BSNL Plans ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या विविध प्लान्स ऑफर करतात. या प्लान्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री डेटापासून ते ओटीटीचे फायदे देखील देण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. Jio, Airtel, Vodafone-Idea मध्ये सतत स्पर्धा सुरु असते.

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत पत्नीच्या नावे उघडा अकाउंट; छोट्याशा गुंतवणुकीवर मिळेल आयुष्यभर पेन्शन

पण, सर्वात स्वस्त प्लानबद्दल बोलायचे झाले , तर Jio किंवा Airtel आणि Vi चे नाव शीर्षस्थानी येत नाही. तर, या यादीत सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL चे नाव सर्वात वर येते. ही कंपनी अनेक Recharge Plans पुरवते. ज्यामुळे युजर्सना अनेक फायदे मिळतात. BSNL चा असाच एक प्लान आहे. ज्याची किंमत फक्त २२ रुपये आहे. सोबत ९० दिवसांची वैधता दिली जात आहे.

कुटुंबातील सर्वांचं आधार कार्ड प्रोफाईल एकाच ठिकाणी करा सेव्ह; चेक करा संपूर्ण प्रोसेस

BSNL Rs 22 रिचार्ज:

या प्लानची किंमत २२ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ९० दिवसांची पूर्ण वैधता मिळते. हा व्हॉईस कॉलिंग प्लान आहे. कोणत्याही स्थानिक आणि STD कॉलसाठी, तुम्हाला ३० पैसे प्रति मिनिट द्यावे लागतील. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा प्लान प्रत्येक प्रदेशात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, रिचार्ज करण्यापूर्वी, तुम्हाला ते कोणत्या भागात उपलब्ध आहे ते तपासावे लागेल. या प्लानमध्ये डेटा आणि एसएमएसचे फायदे दिलेले नाहीत. तुम्हाला फक्त वैधता हवी असल्यास, तुम्हाला हा प्लान आवडू शकतो.

रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाईक बघाच; जूनमध्ये लोणार लॉन्च

या किंमतीत Jio-Airtel-Vi काय ऑफर करत आहे?

Jio कंपनी २५ रुपयांचा प्लान देत आहे. हे 4G डेटा व्हाउचर आहे. या प्लानची वैधता तुमच्या Active Plan इतकीच आहे. या प्लानमध्ये २ जीबी डेटा दिला जात असून हा डेटा संपल्यानंतर तुम्हाला ६४ Kbps चा स्पीड दिला जाईल. तर, Airtel १९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. ज्यामध्ये १ दिवसाच्या वैधतेसह १ GB डेटा दिला जात आहे.

त्याच वेळी, २० रुपयांचा प्लान देखील दिला जात आहे. ज्यामध्ये तुम्हाला १४.९५ रुपयांचा टॉकटाइम दिला जाईल. Vodafone-Idea बद्दल बोलायचे झाले तर, हा १९ रुपयांचा प्लान देखील ऑफर करत आहे. ज्यामध्ये तुम्हाला १ दिवसाच्या वैधतेसह १ GB डेटा दिला जात आहे. त्याच वेळी, २० रुपयांचा प्लान दिला जात आहे ज्यामध्ये तुम्हाला १४.९५ रुपयांचा टॉकटाइम दिला जाईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.