Take a fresh look at your lifestyle.

जि. प. च्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ : खेडकर

0
maher

गणेश जेवरे, ओटीटी न्यूज नेटवर्क

कर्जत : पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ देता आला आहे असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर यांनी कर्जत येथे बोलताना सांगितले.

जिल्हा परिषद सदस्य सुनीता अशोक खेडकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी, महिला, विद्यार्थिनी यांना देण्यात आला आहे. त्याच्या मान्यतेची पत्र सर्व लाभार्थ्यांना देण्याचा कार्यक्रम कर्जत येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे, राजेंद्र तोरडमल, विनोद दळवी, खासदार विखे यांचे स्वीय सहाय्यक दिग्विजय देशमुख, हरी मुरकुटे व आशोक खेडकर यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक पिसाळ, शिंदे व दळवी यांची भाषणे झाली. यानंतर सर्व उपस्थित लाभार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून मंजूर झालेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची मंजुरी पत्र देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.