Take a fresh look at your lifestyle.

उत्तम समाज निर्मितीसाठी प्रेरणा देणारा ‘विदर्भ आयडॉल’ पुरस्कार; वन मंत्री मुनगंटीवारांनी व्यक्त केला ‘हा’ विश्वास

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नागपूर : सध्याच्या कलियुगात समाजासाठी कार्य करणारे फार कमी व्यक्ती आहेत. मात्र ज्या व्यक्तींचे समाजाशी नाते जुळलेले आहे. ते परतफेड म्हणून लोकोपयोगी कार्य करत असतात. अशा व्यक्तींना वेळोवेळी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. सामाजिक जाणिवेतून ऑन धिस टाईम मीडियाने यासाठी पुढाकार घेतला हे कौतुकास्पद आहे. ऑन धिस टाईम मीडियातर्फे देण्यात आलेला ‘विदर्भ आयडॉल’ पुरस्कार पुढे समाजकार्य करणाऱ्या लोकांना उत्तम समाजनिर्मिती करण्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास राज्याचे वन तथा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. रविवारी वर्धा मार्गावरील हॉटेल ली मेरेडियन येथे ऑन धिस टाईम मीडिया प्रा. लि.चा ‘विदर्भ आयडॉल’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मंचावर अभिनेता तथा नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे, परतवाडा येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बाल अनाथालयाचे संस्थापक अध्यक्ष अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर, सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लि. तथा ऑन धिस टाईम मीडिया प्रा. लि.चे चेयरमन संदीप थोरात, ऑन धिस टाईमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद आंबेकर उपस्थित होते.

राज्यातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा; विभागीय पातळीवर कार्यक्षमरित्या सचिवालय प्रश्न मार्गी लावणार

पुरस्कार वितरण सोहळ्यात विदर्भात विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या ५२ कर्तृत्ववान व्यक्तींना अभिनेते मकरंद अनासपुरे व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात कला, क्रीडा, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, उद्योजक, पत्रकारिता आशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग होता.

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संदीप थोरात यांच्या कार्याचे कौतुक करून ऑन धिस टाईम मीडियाच्या चमूचे अभिनंदन केले. पुढे ते म्हणाले, विदर्भ ही महामानवांची, चारित्र्यवान, प्रामाणिक लोकांची भूमी आहे. समाजात परिवर्तन घडवून आणणे ही आपली जबाबदारी आहे. या जाणिवेतून आज अनेक व्यक्ती आपापल्या परीने जमेल तसे समाजकार्य करीत आहेत. या कार्याला ऊर्जा देण्याचे बळ ‘विदर्भ आयडॉल’ पुरस्कार देणार असल्याचेही ते म्हणाले. पुरस्कारानंतर पुरस्कारार्थींची जबाबदारी आणखी वाढत असते. कोणताही चांगला पुरस्कार हा त्या व्यक्तीसाठी शिक्षा असते. कारण त्या व्यक्तीला कोणतेही चांगले वाईट काम विचारपूर्वकच करावे लागतात. नेहमी त्यांना समाजाचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन चांगल्या मार्गानेच मार्गक्रमण करावे लागते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आजपासून पावसाचा पुन्हा जोर वाढणार; ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या आणि पुढे त्यांनी असेच उत्तम कार्य करीत राहावे यासाठी नागपूर येथील टेकडीच्या श्री गणपतीकडे सुख, समाधान आणि आनंद देण्याची प्रार्थना केली. या पुरस्कारानंतर त्यांनी विदर्भापुरतेच मर्यादित न राहता आपले कौशल्ये वाढवून भारताचे आयडॉल बनावे असेही ते म्हणाले. यावेळी मुनगंटीवार यांनी अनाथांची नाथ शंकरबाबा पापळकर यांच्या करायचे कौतुक केले आणि १८ वर्षावरील अनाथ मुलींसाठी कायदा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. संदीप थोरात यांनी ‘विदर्भ आयडॉल’ पुरकाराचा वारसा पूढेही असाच सुरू ठेवावा यासाठी शुभेच्छा दिल्या.

‘विचार’च माणसाला घडवतात : मकरंद अनासपुरे

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजातच घडतो आणि मोठा होतो. समाजात विविध विचारांची माणसे असतात आपण जे विचार आत्मसात करणार तसेच व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडत जाते, असे प्रतिपादन सिने अभिनेते तथा ‘नाम’ फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले. कोणतेही चांगले कार्य करण्यासाठी व्यक्तीचे चांगले विचार असणे आवश्यक आहे. प्रत्येकाचे आयुष्य ठरलेले आहे. त्यामुळे व्यक्तीने आपल्या जीवनात समाजासाठी, लोकांसाठी काहीतरी चांगल्या, सुंदर गोष्टी करून जाण्याचा विचार मनात ठेवला पाहिजे. आजच्या पुरस्कारार्थींनीसुद्धा असाच विचार तेव्हा केला असेल म्हणून आज त्यांना या व्यासपीठावर ‘विदर्भ आयडॉल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, असेही ते म्हणाले. मकरंद अनासपुरे यांनी पुरस्कारप्राप्त सर्व गणमान्य व्यक्तींना शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल ऑन धिस टाईम मीडियाचे चेयरमन संदीप थोरात यांचे अभिनंदन केले.

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील; मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

खुद ही बनो आईना…. : डॉ. शंकरबाबा पापळकर

आईना देखा तो क्या कमाल किया,
खुद ही बनो आईना, जिसे दुनिया देखे।
अशा शायरीच्या माध्यमातून डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी पुरस्कारार्थींना प्रेरणादायी संबोधन केले. ते म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने मोठा होतो. यासारखे पुरस्कार लोकांना सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देतात. यावेळी त्यांनी आपल्या कार्याबद्दल माहिती दिली. तसेच राज्यातील १८ वर्षांवरील मुलींचे काय? १८ वर्षे झाल्यानंतर त्या कुठे जातात? काय करतात? असे प्रश्न उपस्थित करत राज्य आणि केंद्र सरकारने यावर विचार करून या मुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कायदा करण्याची सूचना यावेळी त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली.

दंदे हॉस्पिटलच्या परिचारिकेला पंतप्रधानांचे पत्र; राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते प्रदान

पुरस्कारानंतर पुरस्कारार्थीची जबाबदारी वाढते : संदीप थोरात

समाजोपयोगी कार्य करीत असताना जेव्हा कुणी कामाची दखल घेऊन पुरस्कार देतो तेव्हा त्या व्यक्तीची जबाबदारी वाढते. व्यक्तीकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे समाजापुढे आदर्श व्यक्तिमत्त्व टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लि. तथा ऑन धिस टाईम मीडियाचे चेयरमन संदीप थोरात यांनी केले. यावेळी संदीप थोरात यांनी वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचे गौरव करून लोकांचा नेता म्हणत त्यांचे कौतुक केले. तसेच अनाथांचे नाथ डॉ. शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याचेही कौतुक केले.

पुढे ते म्हणाले, विदर्भ ही समाजसुधारकांची भूमी आहे. समाजासाठी स्वतःला वाहून देणारे अनेक व्यक्ती आहेत. सिंधुताई सपकाळ यांनी मुलींसाठी खूप मोलाचे कार्य केले. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन अनेक व्यक्ती अनाथ मुलींसाठी करीत आहेत. अशांना सहकार्य करून त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. आणि यामुळे ऑन धिस टाईम मीडियाच्या माध्यमातून विदर्भातील उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या व्यक्तींना शाबासकीची थाप देण्यात आली, असल्याचे ते यावेळी म्हणाले. संदीप थोरात यांनी पुरस्कारप्राप्त सर्वांना त्यांच्या पुढील समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे-ठाकरे समर्थक आपसात भिडले; तणावपूर्ण वातावरण पोलिसांच्या मध्यस्तीने निवळले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऑन धिस टाईम मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद आंबेकर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कंपनीच्या कार्यप्रणाली बद्दल माहिती सांगितली. तसेच चेयरमन संदीप थोरात यांनी समाजासाठी, महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. महिलांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, यासाठी ऑन धिस टाईम मीडियातर्फे ‘माहेर कट्टा’, ‘माझं माहेर’ असे उपक्रम सुरू करण्यात आले आहे. सोबतच सामाजिक जाणिवेतून ऑन धिस टाईम मिडियातर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यात येतो. समाजातील विविध घटकांना जोडण्याचे कार्य ऑन धिस टाईम मीडियाच्या माध्यमातून होत असल्याचे मत आनंद आंबेकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन रश्मी मदनकर यांनी तर आभार ऑन धिस टाईम मीडियाचे विदर्भ मार्केटिंग हेड राजेश सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इव्हेंट हेड दिव्या भगत, राधिका आव्हाड, आरती भूते, रुपल दोडके, दीक्षा चिचघरे, मीनाक्षी अड्याळकर, अर्चना ढोके, याकुब शाह, शैलेंद्रसिंग राणा, सौरभ वाघमारे, राजेंद्र क्षीरसागर, राहुल सव्वालाखे, रितिका गजभिये, संकेत डोंगरे यांच्यासह ऑन धिस टाईम मीडियाच्या संपूर्ण चमूने सहकार्य केले.

यंदा अंबाबाईचे दर्शन निर्बंधमुक्त करता येणार; ई-पासची सक्ती रद्द करण्यात आली

कर्तृत्वान ‘विदर्भ आयडॉल’

अनिता शेषराव दारव्हेकर, डॉ. सुरेश चवरे, प्रा. राजकुमार घुले, नवनिर्माण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सावनेर, मुकुंदराव शहाणे, नरेंद्र जिचकार, यशवंत मेश्राम, डॉ. हिमानी गिरोलकर, सविता संजय पुराम, संजय गुणवंतराव वैद्य, प्रदीप सुधाकरराव खांडरे, माया लाकडे, नीलिमा वसंतरावजी काळे-दाणी, डॉ. निरज वाघमारे, डॉ. रामभाऊ (नानासाहेब) रामचंद्र काळबांडे, संतोष शंकरराव मद्दीवार, टीएस अ‍ॅग्रो ऑर्गेनिक्स प्रा.लि. नागपूर, राजीव (राष्ट्रपाल) सुकचंद राऊत, विलासराव कन्नाके, शाहीन जमीर हकीम, नितीन दत्ताजी वासेकर, सिखा पिपलेवार, रोहित चरणदास बोम्मावार, डॉ. ताराकेश्वर उईके, डॉ. उज्ज्वला सहारे (बोरकर), यूनिटी रिअ‍ॅलिटीज, दिलीप किसनराव गर्जे, बापुराव गर्जे, दी महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. गोंदिया, के.पी. थर्मोप्लास्टिक मार्कर, कैलाश राखडूजी धोंडणे, विपीन तळवेकर, हिरा गेडाम, जयंत झाडे (पाटील), जितेंद्र मदनदास शहारे, रेणूका गटलेवार, संजय चिंतामणी, डॉ. पौर्णिमा आनंद इंगोले, छेलबिहारी अग्रवाल, मनोज बोपचे, सरोज नंदकिशोर देशमुख, प्रकाश आबाजी ठाकरे, वीरेंद्र मेश्राम, प्रा. टिकारामजी महादेवराव कोंगरे, कुणाल चोरडिया, शहाजी बालक्रिष्णन आचार्य, इंजि. आनंद चंद्रिकापूरे, कामिनी राजेंद्र दोंदे, प्रवीण फकिरा पाटील, टिकाराम कोंगे, डॉ. सुशांत पिसे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.