Take a fresh look at your lifestyle.

VIDEO केतकी चितळेच्या तोंडाला फासलं काळं, राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचा दणका

ओटीटी न्यूज नेटवर्क

ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या विरोधातील आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलंच महागात पडलंय. आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Alto CNG; व्वा! आता महागड्या पेट्रोलचं टेन्शन विसरा, केवळ ६०००० रुपयांत घरी आणा सीएनजी कार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणे केतकी चितळेला चांगलेच भारी पडले आहे. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला (ketaki chitle) अटक केली. पोलीस तिला घेऊन जात असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी तिच्या तोंडाला काळं फासलं.

शरद पवार यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याने तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. केतकी चितळे हिला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तिला एका रुममध्ये बसून ठेवण्यात आले होते. त्यानंतर केतकीला कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बापरे! शिखर धवनला रबाडाकडून मारहाण? पाहा व्हायरल Video

केतकी चितळेने संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचं विडंबन करुन शरद पवारांवर वादग्रस्त फेसबूक पोस्ट केली. यानंतर केतकीच्या या फेसबूक पोस्टचं नेटकऱ्यांनी निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही या विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच विविध ठिकाणी तक्रार ही दाखल केली.

Comments are closed.