Take a fresh look at your lifestyle.

VIDEO -बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत राज ठाकरे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Balasaheb Thackeray video – राज्यभरात सगळीकडे शांतता दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात आहे. कुठेही तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये याची खबरदारी राज्य सरकारने आणि पोलिसांनी घेतलेली दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसा पठण आंदोलन पुकारले आहे.

तुमच्याकडे 5 रुपयांची जुनी नोट असेल तर घरबसल्या लखपती बनण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका!

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. वाशिम, नेरुळमध्ये अजान सुरू असताना हनुमान चालिसेचं पठण केले. तसेच यावेळी जय श्रीरामच्याही घोषणा दिल्या. दरम्यान, पोलिसांकडून मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजवल्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेला डिवचलं आहे. आता या व्हिडिओचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

आता राज ठाकरे आरोपी नंबर 1, ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला असल्याची चर्चा आहे. याआधी मंगळवारी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण करण्याबाबत आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणार की शरद पवार यांचे ऐकणार असा सवाल केला होता. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे.

Car Loan घेणाऱ्यांना मोठा दिलासा, ‘या’ बँकेकडून व्याजदरात मोठी कपात, चेक करा नवीन व्याजदर

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आज राज्यभरात अजान विरुद्ध हनुमान चालिसाचे आंदोलन सुरु झाले आहे. राज्यातील अनेक भागातील मशिंदींवरील अजानचा आवाज अत्यंत कमी होता. त्यामुळे मनसैनिकांनी मुस्लीम बांधवांचे आभार मानले. तर काही भागात भोंग्यावरील अजान विरुद्ध मनसैनिकांनी हनुमान चालिसा पठण केलं. त्यामुळे पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे. त्याचवेळी आता राज ठाकरे यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची भोग्याविरोधात असलेल्या भूमिकेचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

आता ‘या’प्रकारे घरात बसून PF खात्यातून काढा पैसे, तेही कार्यालयात न जाता, जाणून घ्या सविस्तर

भोंगे, अजान यावरून राज ठाकरे यांनी आज पुन्हा शिवसेनेला डिवचलं. राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्वीट केला. धर्म विकासाचा आड येता कामा नये, मशिदीवरचे लाऊडस्पिकर खाली येतील, रस्त्यावरचे नमाज बंद होतील असं बाळासाहेबांनी त्या भाषणात म्हटलं होतं. बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करून राज ठाकरे यांनी शिवसेनेला बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण करुन दिली. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न कधी पूर्ण करणार, असा सवालच राज ठाकरेंनी हा व्हिडिओ ट्वीट करून विचारला आहे.

BREAKING! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; सभेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आज पहाटे चार वाजल्यापासून संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भांडुपच्या एलबीएस मार्गावर असलेल्या सोनापूर परिसरातील जामा मस्जिद बाहेर कडेकोट पोलीस तैनात करण्यात आला आहे. स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी देखील पहाटेपासून शहरांतील वातावरणाचा अंदाज घेत आहेत. दरम्यान आज पहिली अजानही अनेक मशिदींमध्ये लाऊडस्पीकर विनाच देण्यात आली.

राज ठाकरेंची सभा संपताच अजित पवार कडाडले, म्हणाले, ‘नो कॉम्प्रमाईज’

Leave A Reply

Your email address will not be published.