Take a fresh look at your lifestyle.

Vidhan Parishad Election Result: विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, पाहा कोणी मारली बाजी

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर, भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, प्रवीन दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांचा विजय झाला आहे. शिवसेनेकडून आमशा पाडवी, सचिन अहिर यांचा विजय झाला आहे. दहाव्या जागेसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात चुरस आहे. ( Maharashtra Vidhan Parishad Election 2022)

भाजपच्या उमेदवारांना एकूण 133 मते मिळाले आहेत अशी माहिती भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली. प्रवीण दरेकर यांना 29, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांना प्रत्येकी 30 तर उमा खापरे यांना 28 मते मिळाली आहेत. प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची 17 मते मिळाले आहेत.

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात होते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपनं धक्कातंत्र अवलंबत आपले तिनही उमेदवार निवडून आणले होते त्यामुळे याही निवडणुकीत भाजप पुन्हा चमत्कार घडवणार का ? याबाबत सर्वांनाच उत्सूकता होती.

काँग्रेसने भाजपच्या 2 आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. पण राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांनी काँग्रेसचा हा आक्षेप फेटाळून लावला आहे. काँग्रेसच्या तक्रारीमुळे मतमोजणीला उशिरा सुरुवात झाली.

Comments are closed.