Take a fresh look at your lifestyle.

विनोद कांबळींना आली 1 लाख पगाराची ‘ऑफर’

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : एकेकाळचा स्टार क्रिकेटर विनोद कांबळी सध्या हलाखीचे जीवन जगत आहे. यासंदर्भातील बातमीनंतर कांबळीसाठी मुंबईत एक लाख रुपये पगाराची ऑफर आली आहे.

क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर यांचे दोन जगविख्यात शिष्य म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. मात्र यापैकी आता विनोद कांबळीवर अत्यंत हलाखीची परिस्थिती आली आहे. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या 30 हजार रुपये पेन्शनवरच कांबळी गुजराण करत असून त्याने मदतीसाठी याचना केली आहे.

देशाभिमान असलेल्या कांबळीची व्यथा ऐकताच त्याच्यासाठी नोकरीची पहिली ऑफरसुद्धा आली आहे. सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स लि. चे चेअरमन संदीप थोरात यांनी कांबळीला मुंबईत 1 लाख रूपये प्रतिमाह पगाराच्या नोकरीची ऑफर दिली आहे. संदीप थोरात यांनी ट्विट करून विनोद कांबळीला ही ऑफर दिली आहे.

संदीप थोरात यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘देशाभिमान असलेल्या विनोद कांबळींची व्यथा ऐकून मी व्यथित झालो. आम्ही कांबळी यांना आमच्या फायनान्स कंपनीत मुंबईत एक लाख रुपये पगाराची नोकरी ऑफर करतो.’

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.